हिंगोली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील हिंगोलीतील आमदार संतोष बांगर आणि शिवसेनेच्या नेत्या अयोध्या पौळ यांच्यात सातत्याने टिका टिप्पणी होतांना दिसत आहेत. यातच अयोध्या पौळ यांना फोनवरून धमकी दिल्याने माझ्या जीवाला काही बरंवाईट झालं तर त्याला एकनाथ शिंदे आणि संतोष बांगर जबाबदार असल्याचं पौळ यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…भाजपमध्ये मोठे खांदेपालट, धीरज घाटे पुणे शहराध्यक्ष तर शंकर जगतापांकडे पिंपरी चिंचवडची जबाबदारी
अयोध्या पौळ यांना संतोष बांगर समर्थकांनी फोन द्वारे अश्लिल भाषा वापरली आहे. पौळ यांनी याची सर्व ऑडिओ क्लिप ट्विटवर ट्विट केली आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की, हा अश्लील शब्द वापरलेला काॅल. याआधी एक तासांपासून वेगवेगळ्या नंबर वरुन अत्यंत अश्लील भाषा वापरुन मला जिवे मारण्याच्या धमकीचे फोन येत आहेत. संतोष बांगर यांच्या कार्यकर्त्यांचे. माझ्या जीवाला संतोष बांगर व त्याला पाठीशी घालणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून धोका आहे.
हेही वाचा…दिल्लीत दिसली महाराष्ट्राची ताकद, एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना विशेष स्थान
दरम्यान, गद्दार संतोष बांगर यांचा समर्थक तथा नगरसेवक राम कदम याने फोन करुन अश्लिल भाषा व “तुझे तुकडे तुकडे करुन कुठं फेकून दिले. तर कोणाला पत्ता लागणार नाही” असे शब्द वापरुन मला जिवे मारण्याची धमकी दिली आहे. माझ्या जिवाचे काही बरे वाईट झाले तर त्याला जबाबदार गद्दार संतोष बांगर व त्याला पाठीशी घालणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील. असंही त्यांनी म्हटलंय.
#गद्दार संतोष बांगर यांचा समर्थक तथा नगरसेवक राम कदम याने फोन करुन अश्लिल भाषा व “तुझे तुकडे तुकडे करुन कुठं फेकून दिले तर कोणाला पत्ता लागणार नाही” असे शब्द वापरुन मला जिवे मारण्याची धमकी दिली आहे.
माझ्या जिवाचे काही बरे वाईट झाले तर त्याला जबाबदार गद्दार संतोष बांगर व त्याला…
— Ayodhya Poul – अयोध्या पौळ पाटील. (@PoulAyodhya) July 19, 2023
READ ALSO :
हेही वाचा…अजित पवारांची बंद दाराआड चर्चा, उद्धव ठाकरेंनी सांगितलं कारण, म्हणाले, “राज्यात आता…”
हेही वाचा…उद्धव ठाकरेंची विधानसभेत एंट्री, सोमय्यांवर प्रश्न विचारले असता, म्हणाले की, “अशा…,”
हेही वाचा…“रस्त्यावर दिंगबर साधू फिरतात ना, त्यांचे..” किरीट सोमय्या प्रकणावर प्रश्न विचारले असता प्रकाश आंबेडकर संतापले
हेही वाचा…“रस्त्यावर दिंगबर साधू फिरतात ना, त्यांचे..” किरीट सोमय्या प्रकणावर प्रश्न विचारले असता प्रकाश आंबेडकर संतापले
हेही वाचा…आरएसएसचे कट्टर स्वयंसेवक, सभागृह नेता, भाजपच्या पुणे जिल्ह्याची जबाबदारी धीरज घाटेंवर