मुंबई : कर्नाटकमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाली. याचे पडसाद राज्यात उमटले आहेत. तसंच भाजपवर कडाडून टीका केली जाते आहे. कर्नाटकमध्ये भाजपची सत्ता आहे. कर्नाटकात घडलेल्या घटनेवरून आता मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचा राजीनामा घेण्याचीही मागणी केली जाते आहे. शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी आता यावरून भाजपवर घणाघाती टीका केली आहे.
ठाकरे सरकारचे तिन्ही चाकं पंक्चर, फक्त धूर सोडून प्रदूषण करतंय; अमित शहांनी उडवली खिल्ली
‘कर्नाटकमध्ये भाजपचं सरकार आहे, पण देशाच्या देवाचा अपमान होतो आणि कोणतीही कारवाई होत नाही. चंपा असो की डंफा सगळे मूग गिळून गप्प बसतात. कानडी बांधव महाराष्ट्रातही आहेत. त्यांना इथे त्रास दिला जात नाही. शाळा बंद केल्या जात नाही. तुम्ही आता तुमच्या सरकारला सांगा नाहीतर तुमचं महाराष्ट्रात राहणं कठीण होईल’ असाही इशारा सावंत यांनी दिला आहे. एवढंच नाही तर आम्ही सत्व आणि तत्व सोडलेलं नाही. आम्हाला आमच्या मूळ स्वभावावर यायला लावू नका. छत्रपती शिवाजी महाराज हे धगधगता अग्नी आहेत. त्यांचा अवमान झाल्यानंतर सगळ्यांची बोबडी वळली आहे असाही टोला सावंत यांनी लगावला आहे.
“ज्याच्या त्याच्या कुवती प्रमाणं ते बोलले असतील”; एकनाथ खडसेंनी गुलाबराव पाटलांना दाखवला आरसा
पंतप्रधानांनी काशीतील कार्यक्रमात शिवाजी महाराजांचं नाव घेतलं. आधी बोम्मईंचा राजनीमा घ्या आणि मगच छत्रपती शिवाजी महाराजांसोबत असल्याचं दाखवा. शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या बोम्मईंचा राजीनामा घेण्याची मागणी करणारे घराघरातून पत्रं जाऊ द्या. पेटून उठा हेच शिवसेनेने शिकवलं आहे, असंही त्यांनी सांगितलं.
दोन महिन्यांपासून कुठय पठ्ठ्या; रावसाहेब दानवे यांची मुख्यमंत्री ठाकरेंवर एकेरी भाषेत टीका
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याचा अत्यंत संतापजनक घटना कर्नाटक राज्यातील बंगळुरु मध्ये घडला. या घृणास्पद प्रकारामुळे संपूर्ण शिवप्रेमींमध्ये प्रचंड संतापाची लाट पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काही समाजकंटकांनी गुरुवारी रात्री पुतळ्यावर काळा रंग टाकत महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केली. या घटनेमुळे राज्यातील शिवप्रेमी देखील संतापलेत.
Read also:
- आज निवडणुका झाल्या तर भाजप देशातून हद्दपार होईल; मंत्री नवाब मलिकांचा विश्वास
- आमदार, मंत्री झाला तरी महापालिकेत जीव कसा घुटमळतोय; महापौर पेंडणेकरांचा शेलारांना रोखठोक सवाल
- अमित शहांची मुख्यमंत्र्यांवर टीका, पण प्रकृती स्वास्थ्यासाठीही केली प्रार्थना…
- टीईटी पेपरफुटी प्रकरण: आयुक्त तुकाराम सुपेंच्या घरी 2 कोटी रुपये कॅश आणि सोनं सापडलं
- तुम्हाला माझ्या बापाची आठवण येणार; आर. आर. पाटलांच्या मुलाच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा