मुंबई : राज्यात मागील काही दिवसापासून काॅंग्रेसमध्ये अंतर्गत वाद सुरू झाले आहेत. मागेच माजी मंत्री विजय वटेड्डीवार आणि नाना पटोले यांच्यात वाद उफळून आला होता. काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलावं अशी मागणी गेल्या काही दिवसापासून काॅंग्रेसच्या एका गटाकडून केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर आज राज्यातील काही काॅंग्रेसच्या नेत्यांनी थेट दिल्ली गाठली आहे.
हेही वाचा…“नाना पटोलेंचं ‘प्रदेशाध्यक्ष पद’ जाणार”,? काॅंग्रेसची एक टीम दिल्लीत दाखल, पटोले वाद चव्हाट्यावर
काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवावे, यामागणीसाठी महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी दिल्लीत ठाण मांडले आहे. यात विजय वडेट्टीवार, सुनील केदार, राष्ट्रीय सचिव शिवाजीराव मोघे, मुंबई काॅंग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरूपम यांच्यासह अनेक नेत्यांनी दिल्लीत खरगे यांची भेट घेतलेली आहे. यातील अनेक नेत्यांनी सांगितले आहे की, पटोले यांचा राज्याती कोणत्याही नेत्याशी समन्वय नाही. ते कोणलाच बरोबर घेत नाहीत.
हेही वाचा…अजित पवार, आदित्य ठाकरेंनंतर आता नाना पटोलेंही झाले ‘भावी मुख्यमंत्री’, डोंबिवलीत झळकले बॅनर्स
यातच अलिकडेच प्रदेश काॅंग्रेस कमिटीची वीज कापण्यात आली. नाना पटोले महाराष्ट्रातील नवज्योत सिंह सिद्धू झाले आहेत. काॅंग्रेस वाचवायची असेल तर पटोले यांना हटवावे लागेल. अशी भूमिकाही त्यांनी घेतली आहे. याआधी बाळासाहेब थोरात अन् पटोले यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला होता. त्यामुळे राहुल गांधी यांच्या जवळील असलेले पटोले यांना खरगे हटवणार का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
हेही वाचा…सत्तासंघर्षाच्या निकालानंतर नार्वेकर पहिल्यांदाच दिल्लीत, भाजपच्या बड्या नेत्यांच्या भेटी ? निर्णायाकडे लक्ष
दरम्यान, यावर आता विजय वडेट्टीवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. मी दिल्लीला पक्षश्रेष्ठींना भेटण्यासाठी गेलो होतो. मात्र ही सदिच्छा भेट होती. काॅंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांची भेट घेतली. सोनिया गांधी यांना देखील भेटण्यासाठी गेलो होतो. मात्र त्यांची भेट झाली नाही. कर्नाटकात मोठा विजय मिळवला, त्यामुळे मी त्यांचे अभिनंदन करण्यासाठी गेलो होतो. काॅंग्रेसमध्ये कुठलीही खदखद नसल्याचं वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…एकनाथ शिंदेंनी गोंदियात ‘राष्ट्रवादी’ फोडली…! नगराध्यक्षसह १५ नगरसेवक शिंदे गटात दाखल
हेही वाचा…६६ व्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेसाठी प्रशिक्षण शिबीर आयोजित केले जाणार; अलई यांनी केलेल्या पाठपुराव्याला आले यश
हेही वाचा…डायरी ऑफ महाराष्ट्र खोका’ नावाचा लवकरच चित्रपट बनवणार, राऊतांची मोठी घोषणा
हेही वाचा…ठाकरे गटाच्या नेत्यांकडून पटोलेंची फिरकी, १६ आमदारांबाबत नार्वेकरांना निवेदन दिलं पण.. व्हिडीओ व्हायरल..
हेही वाचा…पुण्यात भाजपने भाकरी फिरवली, पुण्यासाठी नवीन कार्यकारिणी जाहीर, अनेक नव्या चेहऱ्यांना संधी