ठाणे : आगामी महानगरपालिका, विधानसभा आणि लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन अनेक कार्यकर्ते पक्षप्रवेश करतांना दिसत आहेत. यातच गोंदियात शिंदे गटाने राष्ट्रवादीला मोठे खिंडार पाडले आहेत. राष्ट्रवादीच्या गोंदियातील नगराध्यक्षासह १५ नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला गोंदियात मोठा धक्का बसला आहे.
हेही वाचा…अजित पवार, आदित्य ठाकरेंनंतर आता नाना पटोलेंही झाले ‘भावी मुख्यमंत्री’, डोंबिवलीत झळकले बॅनर्स
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी पक्ष प्रवेश सोहळा पार पडला आहे. यावेळी राष्ट्रवादीचे गोंदियातील दोन नगराध्यक्ष, १५ नगरसेवक आणि राष्ट्रवादीच्या असंख्य कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. यावेळी कार्यकर्त्यांकडून बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या नावाचा जयघोष करण्यात आला.
हेही वाचा…सत्तासंघर्षाच्या निकालानंतर नार्वेकर पहिल्यांदाच दिल्लीत, भाजपच्या बड्या नेत्यांच्या भेटी ? निर्णायाकडे लक्ष
दरम्यान, माझ्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत अनेक कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आहे. सडक अर्जूनी नगर पंचायत आणि अर्जूनी नगरपंचायतमधील १५ नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन पक्षात प्रवेस केला आहे. दोन बांधकाम सभापती आणि बाकी वॉर्ड सदस्यांनीही शिंदे गटात प्रवेश केला आहे. अर्जूनी मोरगाव विधानसभा मतदारसंघातील विकासासाठी आम्ही शिंदे गटात प्रवेश केला असल्याचं नगराध्यक्ष डॉ. चंद्रिकापुरे यांनी म्हटले आहे.
READ ALSO :
हेही वाचा…६६ व्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेसाठी प्रशिक्षण शिबीर आयोजित केले जाणार; अलई यांनी केलेल्या पाठपुराव्याला आले यश
हेही वाचा…डायरी ऑफ महाराष्ट्र खोका’ नावाचा लवकरच चित्रपट बनवणार, राऊतांची मोठी घोषणा
हेही वाचा…ठाकरे गटाच्या नेत्यांकडून पटोलेंची फिरकी, १६ आमदारांबाबत नार्वेकरांना निवेदन दिलं पण.. व्हिडीओ व्हायरल..
हेही वाचा…पुण्यात भाजपने भाकरी फिरवली, पुण्यासाठी नवीन कार्यकारिणी जाहीर, अनेक नव्या चेहऱ्यांना संधी
हेही वाचा…“नाना पटोलेंचं ‘प्रदेशाध्यक्ष पद’ जाणार”,? काॅंग्रेसची एक टीम दिल्लीत दाखल, पटोले वाद चव्हाट्यावर