मुंबई : गणेशोत्सवाच्या निमित्ताने 144 कलम मुंबईत लावण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर, लालबागच्या राज्याची प्रतिष्ठापना आज करण्यात आली. यावेळी, पोलिसांनी स्थानिक व्यापारी आणि दुकानदारांना, दुकानं बंद करण्याची नोटीस पाठवली होती. त्यामुळे लालबाग मार्केट परिसरातील स्थानिकांत प्रचंड नाराजीं होती. त्यावर नांगरे पाटील यांच्या मध्यस्थीतून यावर तोडगा काढण्यात आला.
नेता-अभिनेता असला तरी घेणं-देणं नाही, गर्दी होऊ देणार नाही! नांगरे पाटीलांनी ठणकावले
दरम्यान, यांनतर वार्तांकनासाठी गेलेल्या पत्रकारांवर पोलीस निरीक्षक संजय निकम यांनी एखाद्या गुंडाप्रमाणे अरेरावी केली. याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला. अधिकृत पास असतानाही निकम यांनी पत्रकारांना धक्काबुक्की करत बाहेर काढलं. त्यांनतर माध्यमांनी निकम यांना समजुतीने सांगितलं, मात्र, त्यांचा पारा आणखी चढला आणि त्यांनी हात काय, पाय सुद्धा लावू शकतो, असं म्हणत पत्रकाराला काठी दाखवली.
पत्रकारांवर दादागिरी करणाऱ्या इन्स्पेक्टर संजय निकम यांच्यावर तात्काळ कारवाई करा – गुणरत्न सदावर्ते
या प्रकारावरुन आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहेत. ‘माध्यमं आपलं काम बजावत होते. त्यांच्याकडे पासेस देखील होते. तरीही त्यांना मारहाण, धक्काबुक्की होणं हे योग्य नाही. दंडुकेशाहीच्या जोरावर हे सरकार माध्यमांवर दबाव निर्माण करतंय. मागच्या दोन वर्षांपासून असले प्रकार सुरु आहेत,’ असा आरोप केला आहे.
‘हे’ दोन बडे नेते करत आहेत भाजप-शिवसेनेतले अंतर कमी? चर्चांना उधाण
तसेच, ‘जिथे कारवाई झाली पाहिजे तिथे झालीच पाहिजे पण याप्रकारे दंडुकेशाहीच्या जोरावर, कायदा आणि सुव्यवस्थेच्या गप्पा झडत असतील, तर हे वर्णन अतिशय चुकीचं आहे,’ असं म्हणत कारवाईची मागणी केली आहे. ‘कधी गुन्हे दाखल करायचे, कधी कुणाला अटक करायची, हे एकप्रकारे लोकशाहीचा गळा दाबण्याचं काम, या सरकारच्या माध्यमातून होत आहे,’ असा हल्लबोलही त्यांनी केला आहे.
Read Also :
- ‘आव गोयंचो सायबा, मी पुन्हा येईन’, राष्ट्रवादीचा व्यंगचित्रातून फडणवीसांवर निशाणा
- पटोलेंचा पवारांना टोला, म्हणाले “काँग्रेसनं जमीनी राखायला दिल्या अन् त्यांनी…”
- शरद पवारांनी केलेलं करेक्ट वर्णन काँग्रेसवर चपखल लागू होतंय; फडणवीसांचा परफेक्ट निशाणा
- आधी डरकाळी फोडली, आता नरमाईचा सूर? राणे तीनच दिवसांत पलटले
- ED ची पिडा लागेल असं वर्तन करू नका हीच बाप्पा चरणी प्रार्थना – देवेंद्र फडणवीस