मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवास स्थानी गणरायाचे मोठ्या जल्लोषात आगमन करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गणपती बाप्पाकडे आपण एकच साकडं मागत असतो. सर्वांना सुख, समाधान, आरोग्य आणि ऐश्वर्य मिळावं. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आमचा देश आणि राज्य प्रगतीपथावर जावं हीच श्रींच्या चरणी प्रार्थना आहे. सोबतच आपल्या देश आणि महाराष्ट्रासमोर जी संकटे आहेत ती दुर व्हावीत, असं साकडं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गणरायाला घातलं आहे.
“एकनाथ खडसेंचं वय झालं आहे म्हणून आम्ही त्यांना दुर्लक्ष करतोय”; खडसेंविरोधात मोठा गौप्यस्फोट
गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो की, आपल्या देशासमोरची आणि महाराष्ट्रासमोरची सर्व विघ्न विघ्नहर्त्यांनी दुर करावीत. खरोखर संपुर्ण महाराष्ट्र आणि मुंबई सजली आहे. ज्या प्रकारे उत्साह पहायला मिळत आहे याचा मला अभिमान आहे. राज्यात पुन्हा एकदा आपले सण उत्सव आपण साजरे करू लागलो आहोत. ही गणरायाची कृपा आहे, अशी प्रार्थना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
“एकेकाळी खंबीरपणे उद्धव ठाकरेंच्या पाठिशी राहणार, असं म्हणणारा खासदार शिंदे गटात”
सोबतच, महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या गणरायाचं आगमन घराघरात होतंय. दोन वर्षापासून कायम असलेलं कोरोनाचं संकट दूर झालं आहे. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव निर्बंधमुक्त साजरा करूया. गणपती देवता आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि समाधान घेऊन येवो, अशी प्रर्थना मी करतो. महाराष्ट्राच्या विकासाचा पुन:श्च श्रीगणेशा करण्याचा आपण संकल्प करूयात, असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.
“शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांनी म्याव म्याव करू नये”; शिवसेनेचं राणेंना प्रत्युत्तर
सामाजिक भान जपणं आवश्यक आहे. सार्वजनिक गणेशमंडळांनी आरोग्य, शिक्षण, पर्यावरण यासारख्या सामाजिक विषयांवर जनजागृती करावी, अस आवाहन गणेशभक्तांना करतो. आपल्या सर्वांच्या साक्षीनं महाराष्ट्राच्या सर्वांगिण विकासाचा दृढ संकल्प मी केलाय. तो पूर्णत्वास नेण्यासाठी आपली साथ हवी आहे. कोरोनामुळे मंदावलेली विकासाची गती पुन्हा गाठायची आहे. कितीही आव्हानं आली तरी तमा बाळगायची नाही. मोकळ्या वातावरणात मोकळा श्वास घेत, हा गणेशोत्सव धुमधडाक्यात सजरा करूयात,असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणेशभक्तांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
Read also
- अन् चंद्रकांत पाटील अडकले गर्दीत, मोटारसायकलवरून पुण्यात केला प्रवास
- “मातोश्रीच्या अंगणात सुख, शांती लाभावी”; बंडखोर आमदाराचं गणपतीला साकडं
- “55 पैकी 40 आमदार व 18 पैकी 12 खासदार, त्यामुळे दसरा मेळावा आम्हीच घेणार”; शंभुराज देसाई
- श्रीकांत शिंदेंवर सोपवणार मोठी जबाबदारी?; आदित्य ठाकरेंचं पद जाणार
- “माझ्या जिल्हा प्रमुखांविरोधात निवडून दाखवा”; शहाजी बापुंना शिवसेनेचे ओपन चॅलेंज