मुंबई : कोरोना व्हायरसचा मोदी व्हायरस किंवा इंडियन व्हायरस असा उल्लेख करावा, अशा आशयाचे एक टूलकिट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काँग्रेस पक्षाच्या नावाने हे टूलकिट व्हायरल होत असून, देशाची बदनामी करण्यासाठी हे केले जात असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे.
या कथित टूलकिटवरून राज्यातील राजकारण देखील तापले आहे. आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी देखील यावरून ट्विट करत काँग्रेसवर निशाणा साधला आहे. तसेच, काँग्रेसकडून दरवेळी भारतविरोधी भूमिका का घेतली जाते ? असा सवाल त्यांनी केला आहे.
We all can have differences of ideology, opinions & faiths!
BUTWhy is Congress party so desperate to use the word ‘Indian’ Strain?
Why anti India stands each and every time? #CongressToolkitExposed
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 18, 2021
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आपल्या सर्वांचू विचारसरणी, मतं आणि श्रद्धा वेगवेगळी असू शकते. पण काँग्रेस पक्ष भारतीय स्ट्रेन हा शब्द वापरण्यासाठी इतका उतावीळ का झाला आहे? काँग्रेसकडून प्रत्येक वेळी भारतविरोधी भूमिका का घेतली जाते?, असा सवाल फडणवीसांनी केला आहे.
दरम्यान, हे टूलकिट पूर्णपणे बनावट असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. तसेच, यासंदर्भात काँग्रेसने भाजप नेते जेपी नड्डा, संबित पात्रा, स्मृती ईराणी, बीएल संतोष यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.
Read Also :
- ‘भाजप अत्यंत खोटारडा, विखारी व कांगावाखोर पक्ष’
- ‘…तेव्हा विरोधी पक्ष म्हणून कोणत्या बिळात लोळत होता की हप्ता वसूली करत होता?’
- महिन्याभरातच लसीचा दुसरा डोस घेतला? राजेश टोपे म्हणाले…
- “निवडणुका उद्या लावा, मोदी ४०० पेक्षा जास्त जागा जिंकून निवडून येतील”
- खतांच्या दर वाढीवरून चंद्रकांत पाटीलांनेही लिहिले अखेर केंद्र सरकारला पत्र, म्हणाले…