नागपुर : राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर असतांना त्यांनी नागपुर येथे जाहिर सभा घेतली. या सभेत त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नागपुरला कलंक असल्याचा उल्लेख केला. त्यावर आता भाजपच्या नेत्यांकडून उद्धव ठाकरे यांच्यावर टिका करण्यात येत आहे. तर देवेंद्र फडणवीस यांनी देखील उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
हेही वाचा…मुख्यमंत्र्यांसह शिवसेनेचे १६ आमदार अपात्र ठरतील, विधानसभा उपाध्यक्षाचं मोठं विधान
ज्यांच्यावर शेण खाल्ल्याचा आरोप केला, त्यांच्याचसोबत पंक्तीला बसून खाणे याला म्हणतात, कलंक आमच्या ह्दयस्थानी असलेल्या हिंदुह्यदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना जनाब संबोधन सहन करणे, याला म्हणाता कलंक, सकाळ दुपार संध्याकाळ वीर सावरकरांचा अपमान करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसणे याला म्हणतात कलंक, सखाली वीर सावरकरांचा अपमान करणाऱ्यांच्या गळ्यात त्याचदिवशी रात्री गळे घालणे, याला म्हणतात कलंक. ज्यांच्यावर राज्याच्या सरंक्षणाची जबाबदारी, त्यांनीच पोलिसांना चक्क वसुलीला लावणे याला म्हणतात. कलंक असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी ठाकरेंवर पलटवार केला आहे.
हेही वाचा…राज्यातील काॅंग्रेसच्या बड्या नेत्यांची टीम दिल्लीत, मोठ्या राजकीय हालचाली सुरू
पोलिस दलातील स्वपक्षीय कार्यकर्त्याकडून उद्योगपतींच्या घरासमोर स्फोटके ठेवल्यावर त्याची पाठराखण करणे, तो लादेन आहे का असे विचारणे, याला म्हणतात कलंक! कोरोनाच्या काळात मुंबईत लोक मरत असताना मृतदेहांच्या बॅगांमध्ये सुद्धा घोटाळा करणे, याला म्हणतात कलंक! लोकशाहीच्या सर्वोच्च मंदिरात न बसता लोकशाहीच्या पोकळ गप्पा मारणे, याला म्हणतात कलंक! असो, स्वत: कलंकित असले की इतरही कलंकित दिसायला लागतात. तुम्हाला ‘कलंकीचा काविळ’ झाला असेल तर एकदा उपचार करुन घ्या. असा टोला देखील फडणवीसांनी ठाकरेंना टोला लगावला आहे.
‘कलंकीचा काविळ’ !
1) ज्यांच्यावर शेण खाल्ल्याचा आरोप केला, त्यांच्याचसोबत पंक्तीला बसून खाणे याला म्हणतात कलंक!
2) आमच्या हृदयस्थानी असलेल्या हिंदूहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना जनाब संबोधन सहन करणे, याला म्हणतात कलंक!
3) सकाळ, दुपार, संध्याकाळ वीर सावरकरांचा अपमान… pic.twitter.com/efd6rdG8d2— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 10, 2023
READ ALSO :
हेही वाचा…छगन भुजबळांना जीवे ठार मारण्याची धमकी, धमकीचं कारण आलं समोर
हेही वाचा…“अविवाहित राहिन पण, राष्ट्रवादीची युती होणार नाही म्हणजे नाही,” फडणवीसांची ‘ती’ क्लिप ठाकरेंनी भर सभेत ऐकवली
हेही वाचा…“…म्हणूनच, आई-वडिलांची अन् पोहरादेवीची शपथ घ्यावी लागते”, बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
हेही वाचा…“…म्हणूनच, आई-वडिलांची अन् पोहरादेवीची शपथ घ्यावी लागते”, बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
हेही वाचा…“..म्हणून देवेंद्र फडणवीस कार्यक्रमासाठी आले नाहीत,” भर कार्यक्रमात अजित पवारांनी सांगितलं कारण