पुणे : राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यांच्या कार्यालयातील एका कार्यकर्त्यांच्या मोबाईलवर फोन करुन ही धमकी देण्यात आली आहे. धमकी देणाऱ्याने छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची सुपारी मिळाल्याचं सांगितलं. दरम्यान, धमकी देणाऱ्याला पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.
हेही वाचा…राज्यातील काॅंग्रेसच्या बड्या नेत्यांची टीम दिल्लीत, मोठ्या राजकीय हालचाली सुरू
संबंधित व्यक्तीनं मद्यधुंद अवस्थेत धमकीचा फोन केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीने स्वतःचं नाव प्रशांत पाटील असल्याचं सांगितलं. त्यानंतर छगन भुजबळ यांच्या कार्यालयाकडून पुणे पोलिसांना तात्काळ या प्रकरणाची सविस्तर माहिती देण्यात आली.
हेही वाचा…“तेव्हा तुमचा जन्मही झाला नव्हता”, छगन भुजबळांनी रोहित पवारांना सुनावलं
पोलिसांनी सर्व तपशील घेऊन तपास सुरू केला. त्यानंतर मोबाईल नंबरच्या आधारे प्रशांत पाटील या व्यक्तीला महाडमधून पुणे पोलीसांनी अटक केली आहे. मद्यधुंद अवस्थेत प्रशांत पाटीलनं मंत्री छगन भुजबळांना धमकी दिल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. आरोपी प्रशांत पाटील हा मूळचा कोल्हापूरचा आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“अविवाहित राहिन पण, राष्ट्रवादीची युती होणार नाही म्हणजे नाही,” फडणवीसांची ‘ती’ क्लिप ठाकरेंनी भर सभेत ऐकवली
हेही वाचा…“…म्हणूनच, आई-वडिलांची अन् पोहरादेवीची शपथ घ्यावी लागते”, बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
हेही वाचा…“…म्हणूनच, आई-वडिलांची अन् पोहरादेवीची शपथ घ्यावी लागते”, बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
हेही वाचा…“..म्हणून देवेंद्र फडणवीस कार्यक्रमासाठी आले नाहीत,” भर कार्यक्रमात अजित पवारांनी सांगितलं कारण
हेही वाचा…मुख्यमंत्र्यांसह शिवसेनेचे १६ आमदार अपात्र ठरतील, विधानसभा उपाध्यक्षाचं मोठं विधान