मुंबई : सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी देखील पाठिंबा दिल्यानंतर आज ओबीसी आरक्षणाबाबत विधेयक एकमताने मंजूर करण्यात आला. त्यामुळे आता ओबीसी समाजासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मार्ग मोकळा झाला आहे. यावर राज्यातील अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील आपलं मत व्यक्त केले आहे.
विधानसभा अध्यक्षीय निवडणूक 9 मार्चला प्रस्तापित; त्या 12 आमदारांचा देखील प्रश्न सुटणार
ओबीसी आरक्षणासंदर्भातील या विधेयकामुळे राज्यातील ओबीसी आरक्षणाचा अजूनही मार्ग मोकळा झाली नाही आहे. फक्त या विधेयकामुळे निवडणूका काही कालावधीसाठी पुढे जाऊ शकणार आहेत. या काळात सरकारला इम्पेरिकल डाटा गोळा करता येणार आहे. ओबीसी आरक्षण मिळाल्यावरच निवडणुका घेण्याला आमचा पाठिंबा असल्याचे देखील देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.
ओबीसी आरक्षणावर अजित पवारांनी सांगितला फॉर्मुला; सोमवारी बिल देखील मांडणार
नगरपालिका, पालिका, जिल्हा परिषदांची प्रभाग रचना, वार्ड रचना आता यामुळे रद्द झाली आहे. आता सरकार नव्याने यासंदर्भात रचना तयार करणार असून त्याबाबत अहवाल निवडणूक आयोगाला सादर केला जाईल. अगोदर प्रभाग रचना तयार करण्याचे काम आयोग करीत होतं. आता ते काम राज्य सरकार करणार आहे, असंही ते म्हणाले.
नवाब मालिक राजीनामा द्या; विधानसभेच्या आवारात भाजपकडून स्वाक्षरी मोहीम
विधेयक मंजूर झाल्यानंतर आता सरकारला वेळेत इम्पेरिकल डाटा गोळा करावा लागणार आहे. आगामी काळात होऊ घातलेल्या निवडणुकांसाठी हे विधेयक महत्त्वाचे होते. त्यामुळे आम्ही या विधेयकाला समर्थन देत आहोत. तसेच हा बदल गरजेचाच असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
Read also:
- विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीसाठी अजितदादांचं राज्यपालांना साकडं; कोश्यारी निर्णय घेणार?
- मनोज कटके हल्ला प्रकरण; देवेंद्र फडणवीसांचा पोलिसांना इशारा, म्हणाले…
- नरेंद्र मोदींच्या पुणे दौऱ्याला राष्ट्रवादी करणार जोरदार विरोध; विराट मूक मोर्चाचे आयोजन
- नवाब मालिक राजीनामा द्या; विधानसभेच्या आवारात भाजपकडून स्वाक्षरी मोहीम
- विधानसभा अध्यक्षीय निवडणूक 9 मार्चला प्रस्तापित; त्या 12 आमदारांचा देखील प्रश्न सुटणार