पुणे : वेदांत फॉक्सकॉन ग्रुपचा एक लाख 54 हजार कोटी चा प्रकल्प महाराष्ट्र मध्ये येणार होता. परंतु ED सरकारच्या अकार्यक्षमतेमुळे हा प्रकल्प महाराष्ट्रात न येता ईतर राज्यात जाणार आहे या मधून महाराष्ट्रातील हजारो युवक बेरोजगार होणार आहेत सदर महाराष्ट्र द्वेष्ठ्या ED सरकारच्या विरोधात सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसह, माजी नगरसेवक, विधानसभा अध्यक्ष व इतर कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
“महाराष्ट्रातील वारकरी संप्रादयात घुसखोरी; काळजी नको मी प्रयत्न करेन”; शरद पवार
राज्यातील शिंदे- फडणवीस सरकारने वेदांता- फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला स्थलांतरित करण्यासाठी हिरवा कंदील दाखवला. या निर्णयामुळे राज्यातील लाखो तरूणांच्या रोजगारावर गदा आली आहे. याविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने येत्या २० सप्टेंबरला राज्यव्यापी आंदोलन पुकारण्यात आले आहे. या आंदोलनाची सुरुवात आज मुंबई येथून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सूरज चव्हाण यांच्या पुढाकाराने करण्यात आली. यावेळी पन्नास खोके-माजलेत बोके, ढोकळा ना फापडो- वेदांता प्रोजेक्ट आपलो, महाराष्ट्राला धोके – सीएमला खोके, ईडी सरकारचा धिक्कार असो अशा राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या.
“मुख्यमंत्री असताना मोदींनी अनेक प्रकल्प घोषीत करून हजारो करोड रूपये पाण्यात घातले”
दरम्यान वेदांत प्रकल्पावरून राज्यात विरोधक आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादी आणि युवासेनेच्या वतीने शिंदे सरकारविरोधात आज ठिकठिकाणी जोरदार घोषणाबाजी देण्यात आली आहे. यावरून राज्यतील राजकीय नेते एकमेकांवर चिखलफेक करताना दिसत आहे. अशातच यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी फोनवरू सवांद साधला असल्याचं बोलण्यात येत आहे.
Read also
- “याचं डोकं फक्त साखरेच्या खोक्यामध्ये अडकलं”; प्रकाश आंबेडकरांचा राष्ट्रवादीवर अप्रत्यक्षपणे हल्लाबोल
- “पतीव्रताच नसेल तर दागिने घालून काय फायदा?”खडसेंचा शिंदेंना खोचक टोला
- “सुप्रिया सुळेंना सत्ता गेल्याचं दु:ख झालं आहे”; सुधिर मुनगंटीवारांचं सुळेंना प्रत्युत्तर
- उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का..; देशातील 12 सेनेच्या राज्यप्रमुखांचा शिंदेंना पाठिंबा
- “केवळ त्यांच्या मनातला मुख्यमंत्री झाला नाही, म्हणुन हिणवलं जातंय”; आशिष शेलार