मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनापाठोपाठ नागपूरमध्ये होऊ घातलेले हिवाळी अधिवेशन विधानसभा अध्यक्षांविनाच होणार आहे. महाविकास आघाडीला आमदार फुटण्याची भीती असल्याने गुप्त मतदानाऐवजी हात उंचावून मतदानाचा कायदा विधान परिषदेत आधी पारित केला जाणार असल्याचे समजते.
समीर वानखेडेंनी माझ्या मुलीचा सीडीआर मागितला, माझी मुलगी गुन्हेगार आहे काय? – नवाब मलिक
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला तेव्हापासून नवे अध्यक्ष कोण याची चर्चा आहे. मध्यंतरी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने या पदावर दावा केला होता. मात्र, काँग्रेसने जागा वाटपाच्या ठरलेल्या सूत्राकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. त्यात पटोले यांनी आम्हाला जशी सत्तेची गरज आहे तशी शिवसेना-राष्ट्रवादीलाही आहे असे स्फोटक विधान करून एक प्रकारे आपल्याच सहकाऱ्यांना इशारा दिला होता. त्यानंतर अध्यक्ष काँग्रेसचाच होईल अशी नरमाईची भूमिका आघाडीतील इतर दोन पक्षांनी घेतली.
अखेर समीर वानखेडे यांचा करेक्ट कार्यक्रम; लवकरच बदली होणार?
मध्यंतरी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी तत्काळ अध्यक्ष नेमण्याची सूचना केली होती. त्यावर आघाडीतील प्रमुख नेते आणि राज्यपालांमध्ये चांगलेच शाब्दिक युद्ध रंगले होते. नवे सरकार येण्यापूर्वी अध्यक्ष नेमण्याचा अधिकार राज्यपालांना असतो. आता तो सत्ताधाऱ्यांचा आहे, असेही ठणकावून सांगण्यात आले होते.
जनाब संजय राऊत तुम्हाला नबाव मलिकांच्या नजरेतूनच हिंदुस्थान पाहायचाय – चित्रा वाघ
तत्पूर्वी, राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचे नाव अध्यक्षपदासाठी आघाडीवर होते. त्या बदल्यात ऊर्जा खाते नाना पटोले यांना दिले जाणार असल्याची जोरदार चर्चाही काँग्रेसमध्ये होती. मात्र, दिल्लीश्वरांनी अद्याप यास हिरवी झेंडी दिली नाही. त्यामुळे हा विषय थांबला. हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने अध्यक्षांच्या नावाची पुन्हा चर्चा रंगणार आहे.
Read Also :
- तपास अधिकाऱ्याची जात, धर्म काढणं योग्य नाही; आरोप लागले आहेत तर चौकशी करा – देवेंद्र फडणवीस
- महाविकास आघाडी सरकारने औकातीत राहावं, अन्यथा गाठ माझ्याशी आहे; भाजप आमदाराने भरला दम
- सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचं फेसबुक पेज हॅक; सायबर सेलकडे तक्रार
- देवाकडून बंद होणारा ऑक्सिजन पुरवठा मीच सुरू केला, असंही उदयनराजे म्हणतील – शिवेंद्रराजेंचा घणाघात
- शिवसेनेत उडाली खळबळ; नाराज पदाधिकाऱ्यांचे तडकाफडकी राजीनामे, राष्ट्रवादीत प्रवेश करणार?