अहमदनगर : पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरेंच्या एका आडिओ क्लिपने सध्या अहमदनगर जिल्हा आणि राज्यात खळबळ उडवून दिली असून, पारनेरच्या लोकप्रतिनिधीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करण्याचा इशारा त्यांनी यात दिला आहे. यामध्ये त्यांनी थेट कोणत्याही लोकप्रतिनिधीचे नाव घेतले नसले, तरी त्यांच्या बोलण्यातून रोख हा स्थानिक आमदार निलेश लंकेकडे असल्याचे दिसून येत आहे, तर निलेश लंकेंनीही उलट ज्योती देवरेंवर आरोप केले आहेत.
आणखी एका भाजप नेत्याचे वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात, शिवसेनेकडून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
दरम्यान, या प्रकरणाला आता वेगळे वळण लागले असून, तहसीलदार देवरे यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. यातच आज भाजप प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी ज्योती देवरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी, “रडायचं नाही, भिडायचं आणि जिंकायचं. आम्ही सगळे तहसीलदार ताई तुमच्या पाठीशी आहोत,” असं ट्विट करत पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे, भाजपकडून निलेश लंके यांना एकप्रकारे आव्हान दिलं गेलं आहे.
रडने का नही………भिडने का….
हम सब साथ है तहसीलदार ताई ….
लडेंगे और जितेंगे भी 👍👍 @CMOMaharashtra @bb_thorat @Dev_Fadnavis @ChDadaPatil pic.twitter.com/VsqlqJtGjn— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) August 26, 2021
पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्या अडचणी वाढल्या!
दुसरीकडे, देवरे यांच्या दडपशाहीला कंटाळून, तालुक्यातील तलाठी आणि तहसील कर्मचाऱ्यांनी २५ ऑगस्टला आक्रमक होत काम बंद आंदोलन सुरू केलं असून, यात महिला कर्मचाऱ्यांचा देखील सहभाग आहे. देवरे यांची बदली करा, नाहीतर आमची बदली करा! असा त्यांनी पवित्रा घेतला आहे. तसेच, मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरु ठेवण्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे. तर, देवरे यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाचा चौकशी अहवालात देवरे यांच्यावर गंभीर ठपका ठेवण्यात आला आहे.
शिवसेना अडचणीत येणार? रश्मी – उद्धव ठाकरेंविरोधात भाजपची पोलिसांत तक्रार दाखल; कारवाई होणार?
तसेच, या प्रकरणात अण्णा हजारे यांनीही आपली प्रतिक्रिया दिली असून, देवरे यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपाबाबतचे सगळे पुरावे आमदार निलेश लंके यांनी त्यांच्याकडे दिल्यानंतर त्यांनी, “या प्रकरणी वेळ पडली तर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू, पण असे अधिकारी तालुक्यात नकोत,” अशी भूमिका घेतली आहे. तसेच, देवरे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध झाल्यानेच व्यथित होऊन त्यांनी ‘ती’ ऑडिओ क्लिप समाजमाध्यमांवर प्रसारित केल्याचे, लंके यांनी हजारेंच्या निदर्शनास आणून दिले.
Read Also :
- अटकेच्या कारवाईनंतर नारायण राणेंना अमित शहांचा फोन, अनिल परबांच्या व्हिडीओची घेतली दखल
- मोठी बातमी : अटकेच्या कारवाईनंतर नारायण राणेंना अमित शहांचा फोन, काय विचारपूर केली…
- “भोकं पडलेल्या फुग्याला संजय राऊत एवढे का घाबरतात?” – गोपीचंद पडळकर
- भाजप आमदार राहुल कुल यांच्या साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई
- मोठी बातमी! केंद्रीय मंत्री नारायण राणेंना उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा