मुंबई : महाड मध्ये केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी, मुख्यमंत्र्याच्या संदर्भात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर, त्यांना अटक करण्यात आली आणि रात्री त्यांची न्यायालयाने जामिनावर सुटका केली. दरम्यान, या सगळ्या प्रकरणावर भाष्य करण्यासाठी आज राणेंनी, त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी, दोन्ही निकाल माझ्याच बाजूने लागले आहेत. याचाच अर्थ देश कायद्याने चालतो,” असं म्हणत, “‘जन आशीर्वाद’ यात्रा सुरूच ठेवणार! असं ठणकावून सांगितलं.
“दोन्ही निकाल माझ्याच बाजूने, देश कायद्याने चालतो”- नारायण राणे
दरम्यान, काल रात्री उशिरा महाड न्यायालयाने नारायण राणेंना जामीन दिल्यानंतर, तातडीने नारायण राणेंनी आपल्या विरोधातील विविध ठिकाणी दाखल केले गेलेले सर्व गुन्हे रद्द व्हावेत आणि आपल्यावर कोणतीही कारवाई केली जाऊ नये, यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर दुपारी सुनावणी पार पडली आहे. त्यानंतर, न्यायालयाने १७ सप्टेंबरपर्यंत राणेंवर कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे आदेश दिले आहेत.
शिवसेनेला भिडणाऱ्या कार्यकर्त्यांचे निलेश राणेंनी मानले मनापासून आभार
नारायण राणेंच्या आक्षेपार्ह वक्तव्यांनंतर, त्यांच्यावर नाशिक, पुणे, महाड व ठाणे या ४ ठिकाणी तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर त्यांना अटक करण्यात आली. यांनतर राणे यांना महाड प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस.एस. पाटील यांच्या न्यायालयात १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सुटका करण्यात आली. यावेळी त्यांनी ३१ ऑगस्ट व १३ सप्टेंबरला पोलिसांसमोर हजेरी लावण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.
काँग्रेस – राष्ट्रवादीची काय औकात, भांडण लावून सत्तेत आले – चंद्रकांत पाटील
दुसरीकडे, राणेंच्या अटकेपासून-सुटकेपर्यंत राज्यात काल तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. अनेक ठिकाणी शिवसैनिकांनी भाजप पक्ष कार्यालये फोडली, जाळली. तसेच, अनेक ठिकाणी दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते समोरासमोर भिडले. त्यामुळे जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. अनेक ठिकाणी दगडफेक, जाळपोळ करण्यात आली. महामार्ग बंद करण्यात आले, तर भाजपडकूनही शिवसैनिकांना जशास तसे उत्तर देण्यात येत होते.
Read Also :
- परब यांनी पोलिसांना सूचना दिल्या त्यात गैर काय?- विनायक राऊत
- नारायण राणेंच्या विधानाबाबत बाळासाहेब थोरातांची प्रतिक्रिया, म्हणाले…
- आयकर विभागाकडून भुजबळांची १०० कोटींची मालमत्ता जप्त, अटकही होणार! सोमय्यांचा दावा
- मुख्यमंत्र्यांच्या विरोधात भाजपचा ‘ऍक्शन मोड’, शोधलं ठाकरेंनी केलेलं ‘थोबाड फोडणारं’ वक्तव्य
- राणे माणसाची औलाद नाही, तुझा कोथळा बाहेर नाही काढला तर नाव सांगणार नाही – शिवसेना आमदार