मुंबई : महाड मध्ये केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी, मुख्यमंत्र्याच्या संदर्भात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर, त्यांना अटक करण्यात आली आणि रात्री त्यांची न्यायालयाने जामिनावर सुटका केली. दरम्यान, या सगळ्या प्रकरणावर भाष्य करण्यासाठी आज राणेंनी, त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी, अनेक गोष्टींवर भाष्य केलं. तसेच, सिंधुदुर्गात जमावबंदी असतानाही, ‘जन आशीर्वाद’ यात्रा सुरूच ठेवणार! असं त्यांनी ठणकावून राज्य सरकारला सांगितलं.
शिवसेनेला भिडणाऱ्या कार्यकर्त्यांचे निलेश राणेंनी मानले मनापासून आभार
“रत्नागिरीवरून आज स.काळी ५:३० वा. इथे पोहोचलो. दोन्ही निकाल माझ्याच बाजूने लागले आहेत. याचाच अर्थ देश कायद्याने चालतो हे सिद्ध झालं आहे. १७ तारखेपर्यंत कोर्टाची केस असल्याने, काही गोष्टींवर मी बोलणार नाही, पण एवढा दौरा केल्यानंतर पत्रकारांना न भेटणं योग्य वाटलं नाही, म्हणून दौऱ्याची माहिती देण्यासाठी ही परिषद घेतली. यात्रेवेळी माध्यमात जे येत होतं, त्याकडे माझं लक्ष होतं. काही जण माझ्या चांगूलपणाचा फायदा घेतात, त्यावर मी आज काही बोलणार नाही,” असं त्यांनी स्पष्ट केलं.
मुख्यमंत्र्यांच्या विरोधात भाजपचा ‘ऍक्शन मोड’, शोधलं ठाकरेंनी केलेलं ‘थोबाड फोडणारं’ वक्तव्य
“१ ऑगस्टला बीडीडी चाळीच्या पूलबांधणीचा कार्यक्रमावेळी होता. त्याआधी आमदार प्रसाद लाड यांनी सेना भवनाबद्दल काही वक्तव्य केलं. यावर ते महाशय काय बोलले, सेना भवनाबद्दल असं कोणी भाषा करेल, तर त्याचं थोबडं तोडा, हा क्राईम नाही? १२० (ब) होत नाही? आता मी वकीलच डाव्या बाजूला घेऊन बसलो आहे. अजून एक वाक्य, योगी साहेबांबद्दल. हा योगी का ढोंगी? चपलाने मारलं पाहिजे? अजून अमित शाह यांच्याबद्दल ते बोलले, हि काय भाषा आहे? आम्ही तर राष्ट्राबद्दल अज्ञान दाखवलं म्हणून बोललो”
आसमान में थुंकने वालों, करारा जवाब मिलेगा; नितेश राणेंचा शिवसेनेला इशारा
“चिपळूणला झेंडे दाखवले. मी ठीक आहे म्हटलं. शिवसैनिकांची प्रचंड गर्दी? १७ माणसं होती. पुढे गेलो. एका कोपऱ्यात १३ माणसं. आमच्या घरावर किती आले माहिती नाही. त्या पराक्रमी लोकांचे व्हिडीओ मिळतील. पण त्यांचं पोलिसांनी जे कारायचं ते केलं.एवढंच आठवणीत ठेवा. तुम्ही कोणी मला काही करु शकत नाही,” असं म्हणत त्यांनी, मी असं काय बोललो होतो त्याचा राग आला? ते वाक्य मी परत बोलणार नाही. पण शिवसेनेच्या नेत्याने असे शब्द उच्चारले नाहीत?, असा सवाल त्यांनी केला
Read Also :
- परब यांनी पोलिसांना सूचना दिल्या त्यात गैर काय?- विनायक राऊत
- नारायण राणेंच्या विधानाबाबत बाळासाहेब थोरातांची प्रतिक्रिया, म्हणाले…
- आयकर विभागाकडून भुजबळांची १०० कोटींची मालमत्ता जप्त, अटकही होणार! सोमय्यांचा दावा
- राणे माणसाची औलाद नाही, तुझा कोथळा बाहेर नाही काढला तर नाव सांगणार नाही – शिवसेना आमदार
- परिवहन मंत्री अनिल परब यांच्या घरावर हल्ला; पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे प्रक्रिया सुरू