रत्नागिरी : महाड इथे पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत आक्षेपार्ह वक्तव्य केलं आणि त्यावरून काल दिवसभर राज्यभरात विविध ठिकाणी शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांच्यात जोरदार राडा झालेला पाहायला मिळाला. यानंतर राणे संगमेश्वर इथे असताना त्यांना स्थानिक पोलिसांकडून अटक करण्यात आली आणि त्यांना महाड पोलिसांकडे सुपुर्द करण्यात आलं. त्यानंतर रात्री उशिरा महाड न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला.
नारायण राणेंच्या विधानाबाबत बाळासाहेब थोरातांची प्रतिक्रिया, म्हणाले…
दरम्यान, राणेंना अटक होण्याच्या काही मिनिटे आधी परिवहन मंंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेतली एक क्लिप त्यांनतर व्हायरल झाली, ज्यात ते राणेंच्या अटकेसाठी पोलिसांना थेट सूचना देत होते. यावरून आता भाजप आक्रमक झाली असून, शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी, “त्यांनी पोलिसांना सूचना दिल्या असतील तर, त्यात गैर काय? ते रत्नागिरीचे पालकमंत्री आहेत. ते पोलिसांना सूचना करु शकतात,” असं स्पष्टीकरण दिलं आहे.
शिवसेनेला भिडणाऱ्या कार्यकर्त्यांचे निलेश राणेंनी मानले मनापासून आभार
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काल, “अनिल परब यांनी पोलिसांवर दबाव आणला. राणेंच्या अटकेसाठी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री आणि शरद पवार यांची संमती होती. मातोश्रीवर पद्धतशीरपणे सगळा प्लॅन ठरला होता. आता परब यांना आम्ही कोर्टात खेचणार आहोत,” असा इशारा दिला होता. त्यावर बोलताना, “या सगळ्या वायफळ बडबडी आहेत. राणे समर्थकांनी पसरवलेल्या या अफवा आहेत,” असा निशाणा देखील राऊत यांनी भाजपवर साधला.
मुख्यमंत्र्यांच्या विरोधात भाजपचा ‘ऍक्शन मोड’, शोधलं ठाकरेंनी केलेलं ‘थोबाड फोडणारं’ वक्तव्य
तसेच, राणेंवर टीका करताना ते म्हणाले, “राणेंना आत्तापर्यंत ३०२, ३२६, ३३७, ५०६ (२) एवढीच माहिती होती, पण कालच्या घटनेवरुन आता त्यांना बाबासाहेबांनी लिहिलेला कायदा कळाला असेल. केंद्रीय नेत्याने मुख्यमंत्र्यांचा अपमान केला, तर काही होऊ शकत नाही, अशा गैरसमजात ते होते, पण आता त्यांना संविधान आणि कायद्याची ताकद कळाली असेल,” असं सांगत, “फडणवीस एक अभ्यासू व्यक्तिमत्व आहेत, पण सध्या त्यांचा नाईलाज आहे, म्हणून ते समर्थन करत आहेत,” असा चिमटा त्यांनी फडणवीसांना काढला.
Read Also :
- आयकर विभागाकडून भुजबळांची १०० कोटींची मालमत्ता जप्त, अटकही होणार! सोमय्यांचा दावा
- राणे माणसाची औलाद नाही, तुझा कोथळा बाहेर नाही काढला तर नाव सांगणार नाही – शिवसेना आमदार
- परिवहन मंत्री अनिल परब यांच्या घरावर हल्ला; पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे प्रक्रिया सुरू
- आसमान में थुंकने वालों, करारा जवाब मिलेगा; नितेश राणेंचा शिवसेनेला इशारा
- फुग्याला भोक तुमच्या पडलं, आमच्या नाही; चंद्रकांत पाटीलांचा शिवसेनेवर घणाघात