पुणे : नाशिक पोलिसांच्या ताब्यात असलेल्या ड्रग्ज माफिया ललित पाटील याच्यासह चौघांना नाशिक जिल्हा न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. १० दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर चौघांना आज न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यामुळे मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये आता ललित पाटीलचा पुढचा मुक्काम असणार आहे. ललित पाटील, हरीश पंत, रोहित चौधरी, आणि जिशान शेख या चौघांची रवानगी कारागृहात करण्यात आलीय.
हेही वाचा…विधानसभा निवडणुकांच्या पराभवानंतर काॅंग्रेस पुन्हा कामाला लागली, दिल्लीत २१ तारखेला महत्वाची बैठक
सध्या राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरू असून ललित पाटील प्रकरण देखील सभागृहात गाजलं. शिवसेनेचे विधान परिषदेतील आमदार अनिल परब, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे त्याचसोबत काॅंग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी हा मुद्दा चांगलाच लावून धरलाय. तर काॅंग्रेसचे कसब्यातील आमदार रविंद्र धंगेकर सातत्याने या विषयावरून आंदोलन तसेच सभागृहात मुद्दा उचलत आहेत.
हेही वाचा…“शिवसेनेचा वाघ येतोय..,”अदानी विरोधातील मोर्चातील मागण्या कोणत्या ?
दरम्यान, ललित पाटील प्रकरणाला आता एक महिन्याच्या पेक्षा जास्त कालावधी उलटून गेलाय. आतापर्यंत अनेक व्यक्तींना याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. तर काही जणांची चौकशी सुरू आहे. या प्रकरणात राजकीय कनेक्शन असल्याचं बोललं जात आहे.
READ ALSO :
हेही वाचा…ठाकरेंच्या शिवसेनेला शिंदेकडून खिंडार ; तब्बल १०७ पदाधिकारी शिंदे गटात दाखल
हेही वाचा…एका दिवसात तब्बल ३३ खासदार निलंबित ; मोठं कारण आलं समोर
हेही वाचा…पिंपरी चिंचवड पालिकेत कोट्यावधी रूपयांचा भ्रष्टाचार ; आयुक्तासंह,अधिकारी अन् नेत्याचे दाबे दणाणले, प्रकरणात बंटी बबलीची एन्ट्री
हेही वाचा…“महाराष्ट्र हा दिल्लीच्या मार्गावरील पायपुसणं झालंय”, राऊतांची सरकारवर जोरदार टिका
हेही वाचा...सलीम कुत्ता प्रकरणाबाबत राजकीय हालचाली वाढल्या ; ठाकरे गटातील नेत्याच्या अडचणी वाढल्या