म्हापसा : भाजपचे म्हापसा विधानसभा मतदार संघातील उमेदवार जोशुआ डिसुझा यांनी घरोघरी जाऊन नागरिकांच्या गाठीभेटी घेण्याचा धडाका लावला आहे. यादरम्यान, लोकांचा प्रतिसाद देखील उत्तम मिळतोय असं माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले आहे.
‘जोशुआ यांनी आपली नेतृत्व क्षमता सिद्ध करून दाखविली, कांदोळकर यांच्यात नेतृत्व गुण नाही’
ते म्हणाले, 2022 विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी मला पक्षाने संधी दिली आहे. गेली २ वर्षे कोरोना काळात सुद्धा आम्ही लोकांसाठी काम करत आहोत. लोकांचा प्रतिसाद देखील उत्तम मिळतोय. लोकांच्या मनात काही प्रश्न होते कि आपण निवडून दिलेला हा आमदार काम करेल कि नाही मात्र आम्ही या दोन वर्षात अनेक प्रश्न सोडविण्याच्या प्रयत्न केला आहे.
शिवसैनिक परब यांच्यावरील हल्याचा कट पुण्यात रचला; नितेश राणेंना पुण्याला नेण्याच्या तयारीत
यंदाच्या निवडणुकीतही मी सर्वात तरुण उमेदवार आहे.माझ्याकडून तरुणांच्या अनेक अपेक्षा असल्याकारणाने तरुण वर्ग माझ्यासोबत आहे. नगरसेवक,कार्यकर्ते, महिला मंडळाच्या अध्यक्षा, युथ कौन्सेलरचे अध्यक्ष सुद्धा मोठी मेहनत करत आहेत. आम्ही जे दोन वर्षात काम केले ते काम तरुणांना आवडले त्यामुळेच तरुणाई माझ्याकडे आकर्षित होत असून अनेक तरुण माझ्याशी थेट संवाद साधतात असं त्यांनी सांगितले.
देवेंद्र फडणवीसांनी ‘त्या’ मामाजींना भेटावं; मंत्री नवाब मलिकांचा अजब सल्ला
पुढे बोलताना ते म्हणाले, सकाळी आमच्यासोबत येण्यासाठी ३५-४० तरुण आले होते त्यांना आम्हाला माघारी पाठवावे लागले कारण निवडणूक आयोगाच्या कोरोना बाबतच्या दिशा निर्देशांचे पालन करावे लागणार आहे. आम्ही ज्या घरात जातो त्या घरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
Read also:
- नितेश राणेंकडून अमित शाहांचा फोटो असलेलं ‘ते’ ट्विट अचानक डिलीट; काय घडलं नेमकं…
- अजितदादा, अशा नालायकापासून आम्हाला वाचवा; गोपीचंद पडळकरांनी केला व्हिडिओ व्हायरलं
- अखेर ठाकरे सरकारची माघार; भाजपच्या १२ आमदारांच निलंबन घेणार मागे?
- दहावी बारावीच्या परीक्षा ऑफलाईनच होणार; राज्य शिक्षण मंडळाची घोषणा
- उद्धव ठाकरे-अजित पवार म्हणजे ढवळ्या पवळ्याची जोडी – बंडातात्या कराडकर