नाशिक : राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला २४ डिसेंबर पर्यंत वेळ वाढवून दिला आहे. जरांगे पाटील यांनी सरसकट मराठा प्रमाणपत्राची मागणी केली आहे. याच दरम्यान, मंत्री छगन भुजबळ यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे.
हेही वाचा…“काहीच देणं घेणं नसल्यासारखं आपण मात्र बद्रीनाथच्या दर्शनाला निघून जायचं”, शिंदे गटाची ठाकरेंवर टिका
सरसकट मराठ्यांना ओबीसी प्रमाणपत्र देण्यास छगन भुजबळ यांनी विरोध केला असून त्यांनी यासाठी आता राज्यव्यापी दौराही सुरू केला आहे. यातच त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यात ते म्हणाले की, आपल्यावर अन्याय होत असेल तर आपल्याला बोलायला पाहिजे. जर आपण गप्प बसलो तर आपल्याला कोणीही मदत करायला येणार नाही. त्यामुळे आता थोडी दहशत माजवायची आणि जे पाहिजे ते करून घ्यायचे. समोरच्या दरवाज्यातून प्रवेश मिळत नाही. म्हणून मागच्या दरवाज्यातून प्रवेश मिळवाये काम सुरू आहे. आमचा मराठा आरक्षणाला विरोध नाही.
हेही वाचा…अजित पवार अन् देवेंद्र फडणवीस आमनेसामने, बारामतीच्या ‘या’ गावात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उद्या मतदान
दरम्यान, मंत्री छगन भुजबळ यांच्या विधानावर शरद पवार गटातील नेते प्रशांत जगताप यांनी भाष्य केलंय. प्रत्येक समाजाला त्यांचा न्याय्य हक्क हा मिळालाच पाहिजे याबद्दल कोणाच्याच मनात साशंकता नाही. परंतू त्यासाठी एक कॅबिनेट मंत्री राज्यात “दहशत” माजवण्याची भाषा करत असेल तर दहशतीतून होणाऱ्या परिणामांना जबाबदार कोण? असा सवाल प्रशांत जगताप यांनी केला असून देवेंद्र फडणवीस आपण महाराष्ट्राचे गृहमंत्री आहात याचा विसर पडू देऊ नका. असंही त्यांनी म्हटलंय.
प्रत्येक समाजाला त्यांचा न्याय्य हक्क हा मिळालाच पाहिजे याबद्दल कोणाच्याच मनात साशंकता नाही. परंतू त्यासाठी एक कॅबिनेट मंत्री राज्यात “दहशत” माजवण्याची भाषा करत असेल तर दहशतीतून होणाऱ्या परिणामांना जबाबदार कोण? @Dev_Fadnavis आपण महाराष्ट्राचे गृहमंत्री आहात याचा विसर पडू देऊ नका https://t.co/LXCtkIOBG9
— Prashant Sudamrao Jagtap (@JagtapSpeaks) November 6, 2023
READ ALSO :
हेही वाचा…महाराष्ट्रात ‘भारत राष्ट्र समिती’ पक्षाची एंट्री, ‘या’ ग्रामपंचायतींवर बीआरएसने रोवला झेंडा
हेही वाचा…नगरमध्ये विखे पाटील अन् बाळासाहेब थोरातांची प्रतिष्ठापणाला, ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत धक्कादायक निकाल
हेही वाचा…रोहित पवारांना जोरदार धक्का, कर्जत मतदारसंघातील ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा
हेही वाचा…“सचिन वाझे मातोश्री आणि वर्षावर का जायचे? भाजपच्या मंत्र्याने राऊतांना विचारला खोचक सवाल
हेही वाचा…“अजित दादांच्या दबावामुळेच कार्यक्रमाचं निमंत्रण रद्द, मीरा बोरवणकरांचा गंभीर आरोप”