चंद्रपुर : देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपची सत्ता आल्यानंतर केंद्रीय तपास यत्रणांचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून केली जात आहे. या दरम्यानच्या काळात राज्यातील एव्हाना देशातील अनेक विरोधी पक्षातील नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा पाठीमागे लागला आहे. यातच आता राज्यातील एकमेव काॅंग्रेसच्या खासदाराच्या मेव्हण्यावर ईडी पाठीमागे लागल्याने एकच खळबळ उडाली आहे.
हेही वाचा…ठाकरे गटाच्या नेत्यांकडून पटोलेंची फिरकी, १६ आमदारांबाबत नार्वेकरांना निवेदन दिलं पण.. व्हिडीओ व्हायरल..
चंद्रपुर येथील काॅंग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांचा मेव्हणा मागील काही दिवसापासून ईडीच्या रडाडवर आला आहे. प्रवीण काकडे असं धानोरकर यांच्या मेव्हण्यांच नाव असून विविध पोलीस स्थानकात यांच्याविरोधात गुन्हे दाखल आहेत का ? याबाबत ईडीकडून चंद्रपुर जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे विचारणा केली जात आहे. यासंदर्भात नागपुर कार्यालयाने पोलीस अधिक्षकांना पत्रही पाठवले आहे.
हेही वाचा…पुण्यात भाजपने भाकरी फिरवली, पुण्यासाठी नवीन कार्यकारिणी जाहीर, अनेक नव्या चेहऱ्यांना संधी
दरम्यान, जिल्ह्यात चौकशीसाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांना सहकार्य करण्याची विनंतीही करण्यात आली आहे. राज्यातील एकमेव काॅंग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांच्या निकटवर्तीयांवर ईडीची वक्रदृष्टी वळल्याने जिल्ह्यात मोठी राजकीय खळबळ उडण्याची शक्यता आहे.
READ ALSO :
हेही वाचा…भाजप-शिंदे गटात पहिली वादाची ठिणगी.. आम्हाला सापत्न वागणुक मिळते, खासदारांचा हल्लाबोल
हेही वाचा…पटोलेंविरोधात तक्रार करण्यासाठी गेलेल्या वडेट्टीवारांचा दिल्ली खुलासा, म्हणाले, की आमच्यात…
हेही वाचा…एकनाथ शिंदेंनी गोंदियात ‘राष्ट्रवादी’ फोडली…! नगराध्यक्षसह १५ नगरसेवक शिंदे गटात दाखल
हेही वाचा…६६ व्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेसाठी प्रशिक्षण शिबीर आयोजित केले जाणार; अलई यांनी केलेल्या पाठपुराव्याला आले यश
हेही वाचा…डायरी ऑफ महाराष्ट्र खोका’ नावाचा लवकरच चित्रपट बनवणार, राऊतांची मोठी घोषणा