IMPIMP
Eknath Khadse vs Raksha Khadse will be contested in Raver Lok Sabha Constituency Eknath Khadse vs Raksha Khadse will be contested in Raver Lok Sabha Constituency

राष्ट्रवादीतल्या सासऱ्यावर भाजपमधील सून भारी पडणार का? ; ‘या’ लोकसभा मतदारसंघात निवडणूक गाजणार

जळगाव : आगामी लोकसभा निवडणुकाचं रणशिंग फुंकण्यास काही महिन्याचा अवधी शिल्लक राहिला आहे. त्यादृष्टीने आता प्रत्येक पक्षांनी आपापल्या लोकसभा मतदारसंघाकडे विशेष लक्ष देण्यास सुरूवात केली आहे. राज्यात महायुती विरूद्ध महाविकास आघाडी असा सामाना होणार असून जागावाटपाचा फॉर्म्युला अजूनही ठरला नसला तरी काही जागा फिक्स झाल्याची माहिती समोर आली आहे. यातच पक्षाने संधी दिल्यास रावेर लोकसभा निवडणूक लढणार असे विधान राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी केलं आहे. सध्या या मतदारसंघात एकनाथ खडसे यांच्या सून रक्षा खडसे या भाजपच्या खासदार आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुक झाली तर एकनाथ खडसे विरूद्ध रक्षा खडसे अशी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राष्ट्रवादीतला सासरा विरूद्ध भाजपमधली सून अशा राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत.

हेही वाचा..आदित्य ठाकरेंचा कोल्हापुर दौरा, ‘या’ दोन ठिकाणी ठाकरेंची तोफ धडाडणार 

रावेर लोकसभा मतदारसंघाची जागा पक्षाला मिळावी आणि ती मिळाल्यास उमेदवारीसाठी आपला विचार व्हावा अशी विनंती पक्षाला केली असल्याचे एकनाथ खडसे यांनी सांगितले आहे. तर पक्षाने आपल्याला दोन वेळा संधी दिली आहे. पुन्हा जर पक्षाने तिसऱ्या वेळेस संधी दिली तर आपणही उमेदवार म्हणून तयार आहोत असे रक्षा खडसे यांनी म्हटलं आहे. रक्षा खडसे यांनी एकप्रकारे सासऱ्यांनाच निवडणुकीचे आव्हान दिले आहे. यातच गेल्या पाच वर्षात आपण जनतेची कामं केली आहेत. त्यामुळे पक्ष काय निर्णय घेतो ते आता पहावे लागणार असल्याचंही रक्षा खडसे यांनी सांगितलंय.

हेही वाचा“महाराष्ट्रातला युवा आता थंड बसणार नाय,”आणखी एक प्रकल्प गुजरातला पळवला, पवारांची सरकारवर जोरदार टिका 

दरम्यान, दरम्यान, २०१९ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत विद्यामान खासदार रक्षा खडसे यांनी राष्ट्रवादीच्या उल्हास पाटील यांचा तब्बल ३ लाख ३५ हजार ८८२ मतांनी पराभव केला होता. रक्षा खडसे यांना या निवडणुकीत जवळपास ६ लाख ५३ हजार ०५९ मते पडली होती. तर उल्हास पाटलांना ३लाख १८ हजार ७९३ मते पडली होती. तर तिसऱ्या क्रमाकांवर वंचित बहुजन आघाडीच्या नितीन कांडेलकर यांनी ८८ हजार ५६ मते मिळवली होती. यातच आता एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यामुळे एकनाथ खडसे यांची ताकद तसेच वंचित सोबत आल्यास त्यांची ताकद यामुळे रक्षा खडसे यांना ही निवडणुक जड जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

READ ALSO :

हेही वाचा..“पुर्वी मंबाजी, तुंबाजी होते, आताच्या काळात मिटकरी आहेत”, शरद पवार गटाने मिटकरींना डिवचलं 

हेही वाचामहायुतीत जागांचा पेच वाढला, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने ‘या’ जागांवर दावा सांगितला 

हेही वाचा…आगामी निवडणुकीत भाजपकडून धक्कातंत्राचा वापर ; फडणवीसांनी नेत्यांना दिली ‘ही’ तंबी 

हेही वाचा“मुथरेत श्रीकृष्ण मंदिर उभारावं,” नितेश राणेंची पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे पत्राद्वारे मागणी 

हेही वाचा..“नववर्ष मावळतांना मावळची जागा आपली पाहिजे”, मावळ लोकसभेसाठी ठाकरे गटाचा नेता ठरला ?