मुंबई : ओबीसी आरक्षणाचा तिढा कायम असताना दुसरीकडे ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक घेण्याची तयारी राज्य निवडणूक आयोगाने सुरू केली आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधीमंडळ अधिवेशनात विधानसभेने ओबीसी आरक्षणाचा निकाल येईपर्यंत निवडणूक पुढे ढकलण्याचा ठराव केला होता. मात्र, राज्य निवडणूक आयोगाने आता नाशिक, सोलापूर, अकोला, अमरावतीसह 13 महापालिकांच्या निवडणुका घेण्याची तयारी सुरू केली आहे. राज्य निवडणूक आयोगाने सर्वच राजकीय पक्षांना धक्का दिला आहे.
नवाब मालिकांनी दोन ऑडिओ क्लिप ऐकवत पुन्हा फोडला बॉम्ब; समीर वानखेडेंवर केले ‘हे’ गंभीर आरोप
सर्वोच्च न्यायालयाचा हवाला देत निवडणूक आयोगाने २९ डिसेंबर २०२१ रोजी १३ महापालिकांच्या आयुक्तांना निर्देश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसींना आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार तिहेरी चाचणी घेत नाही, तोपर्यंत ओबीसींच्या या जागा सर्वसाधारण म्हणून समजल्या जातील. सर्वोच्च न्यायालयाच्या पुढील आदेशापर्यंत ओबीसींना कोणतेही आरक्षण मिळणार नाही, असे आयोगाने स्पष्ट केले आहे. या आदेशानुसार प्रारूप रचनेचा संपूर्ण प्रस्ताव तयार करून ४ ते ६ जानेवारीदरम्यान राज्य निवडणूक आयोगास संबंधित उपायुक्तांना (निवडणूक) व्यक्तिश: उपस्थित राहून मान्यतेकरिता सादर करायचा आहे. या डेटाचा वापर सर्वसाधारण प्रवर्गातील (आता ओबीसी सर्वसाधारण) महिलांसाठी ५० टक्के जागा राखीव ठेवण्यासाठी केला जाईल.
“एकमेकांची उणी-दुणी काढण्यापेक्षा केंद्रातून निधी आणा”; अजित पवारांचा नारायण राणेंना सल्ला
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, यावर सरकारने स्पष्ट निर्णय घ्यावेत, अन्यथा हा ओबीसी समाजावर कधीही न भरून येणारा अन्याय ठरेल. सरकारने सर्वोच्च न्यायालयाचे पालन न केल्यामुळे आणि तिहेरी चाचणी वेळेत न घेतल्याने ओबीसींना आरक्षणापासून वंचित ठेवण्यात आले आहे. सरकारने दोन वर्षांपासून काहीही न करता केंद्राकडे बोटे दाखवली.
पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत जातीवाद; अजित पवारांनी व्यक्त केली खंत
राज्य निवडणूक आयोगाने सीमांकनासाठी प्रभाग रचनेचे प्रारूप मागवले आहेत. ते ६ जानेवारीपर्यंत भरून पाठवायचे आहेत, असे नागपूर महापालिका आयुक्त राधाकृष्ण बी यांनी सांगितले. तर नागपूर, कल्याण-डोंबिवली, कोल्हापूर, नवी मुंबई, उल्हासनगर, सोलापूर, अमरावती, अकोला, पिंपरी-चिंचवड, नाशिक, पुणे आणि ठाणे या महापालिकांना हा सराव करण्यास सांगण्यात आले असल्याचेही सांगितले आहे.
Read also:
- मी अजित पवारांचा मोठा फॅन; भाजप आमदार जयकुमार गोरेंनी उधळली दादांची स्तुतीसुमने
- सांगली जिल्हा बँकेच्या राजकारणात नवा वाद, बँकेच्या डायरीतून पडळकरांचे नाव गायब
- पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा; यापुढे सर्व सरकारी वाहने असणार इलेक्ट्रिक
- ठाकरे – पाटील विवाहला लागली कोरोनाची नजर, आता अंकिता पाटील देखील कोरोना पॉझिटिव्ह
- राज्यपालांवर बंदूक ठेवून भाजपा महाराष्ट्रात राजकारण करत आहे – नाना पटोले