पुणे: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांनी दिल्लीतूनच महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढेल, अशी घोषणा केली आहे केली आहे. यांच प्रश्वभुमिवर आगामी पुणे महापालिका स्वबळावर लढण्याचा इरादा जाहीर करतानाच प्रभाग दोन उमेदवार असतील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.
हे पण वाचा: एकदा शेतकऱ्यांच्या धर्तीवर कर्जमाफी द्या, पुन्हा कधीच भीक मागणार नाही! जगण्यासाठी त्यांनी जोडले हात
यामुळे पुणे शहरातीली कार्यकत्यांनमध्ये एक नविच उर्जा बघायला मिळत आहे. काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचे नाना पटोले यांनी जाहीरी केले आणि कार्यकत्यांना संजवीनीच मिळाली आहे. अनेंकांनी तर निवडणुक लढण्याची तयारी ही चालू केली आहे.
हे पण वाचा: दादा, तुम्हीच आमचे वाली; चिपळूणच्या व्यापाऱ्यांची नारायण राणेंना आर्त हाक
नाना पटोले शुक्रवारी पुण्यामध्ये होते, त्यांनी एक-दोन नाही तर पाच कार्यक्रम घेतले, तेव्हा त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला, ऐरवी पुण्यामध्ये काँग्रेसच प्रदेशध्यक्ष फिरकत नसत, परंतू आता कार्यकर्त्यांशी मनसोक्त गप्पा मारल्या, यामुळे कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण बघायला मिळाले आहे.
हे पण वाचा: हर्षवर्धन पाटलांचा कुणी केला ‘करेक्ट कार्यक्रम’? भरणेंचा मोठा गौप्यस्फोट
‘नाना म्हणजे भारी असामी’ असे कार्यकर्ते बोलत आहेत. आजीमाजी नगरसेवकांच्या बैठकीत नानांनी सरळ सांगून टाकले की आपण शंभर टक्के स्वबळावरच लढणार. महाविकास आघाडीत जागा वाटपात काँग्रेसला गुंडाळले जाईल अशी धाकधूक असणारे इच्छुक नानांच्या या आश्वासनामुळे आनंदले आहेत. एरवी ओस असलेल्या काँग्रेस भवनमधील राबता यातून वाढला असून शहराध्यक्ष रमेश बागवे यांच्या टेबलभोवतीची गर्दीही बोलकी होऊ लागली आहे.
हे पण वाचा: भास्कर जाधवांना एवढा कशाचा माज? मुख्यमंत्र्यांसमोर महिलांबरोबर गैरवर्तणूक आणि अरेरावी
जुन्या-नव्या नेत्यांनाही नानांनी बऱ्याच कानपिचक्या देत काही कानमंत्रही दिल्याची चर्चा आहे. तुमच्या शहरात तुमचीच मर्जी चालणार, पण त्यासाठी कष्ट करा, नुसतीच शायनिंग चालणार नाही, असे नानांनी बजावले असल्याची माहिती मिळाली. मित्रांना किती जवळ आणायचे, त्यातून फायदा होतो आहे की नुकसान हे तुम्ही ठरवायचे, असे सांगत त्यांनी ‘राष्ट्रवादी’पासून दोन हात लांबच राहण्याचा सल्ला अप्रत्यक्षपणे दिल्याचे एका नेत्याने सांगितले.
यावेळी काँग्रेस शहर शहराध्यक्ष रमेश बागवे म्हणाले की, आमचा एकच हेतू आहे, भाजपाला पुणे महापालिकेतून हाणून पाडायचे आहे. पणे महापालिकेत महापौर हा काँग्रेसचा बसवण्याच्या तयारीने काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी कामाला लागायचे सुद्धा कार्यकत्यांना यावेळी सांगितले आहे.
Read Also :
- मुख्यमंत्री पाहुणे आहेत का?, नारायण राणे जिल्हाधिकाऱ्यावर संतापले
- नारायण राणे हे ज्या पक्षात आहेत, तो पक्ष पोथीपुराणावर चालणारा पक्ष, महाराष्ट्रात अशा गोष्टींना थारा नाही
- दादा, तुम्हीच आमचे वाली; चिपळूणच्या व्यापाऱ्यांची नारायण राणेंना आर्त हाक
- हर्षवर्धन पाटलांचा कुणी केला ‘करेक्ट कार्यक्रम’? भरणेंचा मोठा गौप्यस्फोट
- परळीत पंकजा मुंडेंच्या वाढदिवसानिमित्त मुंडे समर्थकांची बॅनरबाजी, मात्र भाजपच्या नेत्यांचे फोटो गायब