रायगड: रायगडमधल्या महाडमध्ये डोंगरकडा कोसळून तब्बल ४४ लोकांना जीव गमवावा लागला. चिपळूण, खेडमधल्या पुराने भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. या सगळ्या परिस्थितीची पाहणी काल केंद्रिय मंत्री नारायण राणे केली. त्यावेळी त्यांच्यासोबत दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्षनेते होते.
हे पण वाचा: परळीत पंकजा मुंडेंच्या वाढदिवसानिमित्त मुंडे समर्थकांची बॅनरबाजी, मात्र भाजपच्या नेत्यांचे फोटो गायब
इथलं प्रशासन बेजबाबदार आहे. नारायण राणे जिल्हाधिकाऱ्यांना म्हणाले, “तो सीएम बीएम गेला उडत. आम्हाला कुणाचीही नावं सांगू नका. प्रांत सांगतो पालकमंत्र्यांसोबत आहे, तुम्ही सांगताय सीएमसोबत आहे. इथं कोण आहे? इथं तुमचा एक तरी अधिकारी आहे का? आतापर्यंत तुम्हाला स्वस्थ बसू दिलं, आता जागेवर बसू देणार नाही हे लक्षात ठेवा.”
हे पण वाचा: माझ्या जनतेवर दुःखाचा डोंगर, जन्मदिन साजरा करू नका; वाढदिनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचे आवाहन
त्यांना नियामांची, प्रोटोकॉलची माहिती नाही. बाजारपेठेत आल्यावर एकही अधिकारी येऊन भेटले नाहीत. अडिशन कमिश्नर, प्रांत अधिकारी कार्यालयात बसून आहेत दोन विरोधी पक्षनेते, एक केंद्रीय मंत्री चिपळूणमध्ये आले असूनही ते भेटायला आले नाही. हा अधिकाऱ्यांचा बेजबाबदारपणा आहे आणि त्याबद्दल योग्य ती कारवाई केल्याशिवाय माझ्यासारखा माणूस गप्प बसणार नाही.
हे पण वाचा: राज्याला मुख्यमंत्रीही नाही आणि प्रशासनही नाही, राणेंची बोचरी टीका
केंद्रीय विभागात कारवाई केल्याशिवाय गप्प बसणार नाही. असे अधिकारी खुर्चीवर आमच्या विभागात राहता कामा नये लोकं रडत आहेत आणि अधिकारी मुख्यमंत्र्यांना पोहचवायला गेले आहेत. मुख्यमंत्री पाहुणे आहेत का? त्यांचे कामच आहे. अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचे नारायण राणे यांनी म्हटलं आहे.
Read Also :
- नारायण राणे हे ज्या पक्षात आहेत, तो पक्ष पोथीपुराणावर चालणारा पक्ष, महाराष्ट्रात अशा गोष्टींना थारा नाही
- दादा, तुम्हीच आमचे वाली; चिपळूणच्या व्यापाऱ्यांची नारायण राणेंना आर्त हाक
- हर्षवर्धन पाटलांचा कुणी केला ‘करेक्ट कार्यक्रम’? भरणेंचा मोठा गौप्यस्फोट
- परळीत पंकजा मुंडेंच्या वाढदिवसानिमित्त मुंडे समर्थकांची बॅनरबाजी, मात्र भाजपच्या नेत्यांचे फोटो गायब
- आढावा बैठकीनंतर पूरग्रस्त भागासाठी, मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला मोठा निर्णय