मुंबई : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी रांग लागत आहे. अशातच आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर आता राजकीय चर्चांना ऊत आला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील राज ठाकरे यांची भेट घेतली होती.
आदित्य ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची बॅनरबाजी
अलिकडेच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तसेच त्यानंतर विनोद तावडे यांनी शिवतीर्थावर राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर आज एकनाथ शिंदे यांनी देखील राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यामुळे सध्या तर्क- विर्तकांना उधाण आलं आहे. पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भेट घेतली असल्याची चर्चा सध्या रंगली आहे.
“शिंदे-फडणवीस सरकारमध्ये रासपला कॅबिनेट मंत्रिपद मिळावं”; महादेव जानकरांची मागणी
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर राज ठाकरे यांनी त्यांच्याविरोधात भूमिका घेतली होती. त्यानंतर त्यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक देखील केलं होतं. त्याचबरोबर अलिकडील झालेल्या सभांमधून त्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा जोरदार लावून धरला होता. त्याला भाजपने देखील प्रत्यक्ष- अप्रत्यक्षपणे पाठिंबा दिला होतो. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये भाजप मनसे युती करणार असल्याच्या बातम्या देखील येत होत्या.
“ये मीठा है और कडू है..”; सत्तरांचा बच्चू कडूंना टोला
दरम्यान, एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यासंदर्भात शिवसेना नेमकी कुणाची यावर सर्वोच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित आहे. जर एकनाथ शिंदे यांच्या विरोधात निकाल लागला तर त्यांना एखाद्या पक्षामध्ये विलीन व्हावं लागेल. त्यामुळेच एकनाथ शिंदे हे राज ठाकरे यांच्या भेटीला आल्याची शक्याता वर्तवली जात आहे. तसेच अलिकडेच राज ठाकरे यांना एकनाथ शिंदे यांच्याबाबत त्यांना विचारण्यात आलं होतं. त्या वेळी देखील त्यांनी सांगितलं होतं.
Read also
- “शिक्षक, पदवीधर मतदारसंघ रद्द करा”; प्रशांत बंब यांची मागणी
- रोकडा सवाल; मग हिंदु, मुस्लिम, शीख, बौद्ध, यांच्यासाठी पण वेगळे शौचालय बांधणार का ? जितेंद्र आव्हाड
- “भाजपाची बॅनरबाजी म्हणजे थिल्लरपणा”; शिवसेनेचा भाजपवर हल्लाबोल
- शिंदे सरकारमध्ये 26 कॅबिनेट तर 17 राज्यमंत्री..! दिवाळीपुर्वी घेणार 7 कॅबिनेट तर 17 राज्यमंत्री शपथ
- “बच्चू कडूंना गोड, खरं खार की तिखट द्यायचं हे शिंदे ठरवतील”; अब्दुल सत्तार