मुंबई : राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाविरूद्ध धडक कारवाई केली आहे. अलिकडेच एनआयएने देशात विविध ठिकाणी छापे टाकून 150 हून अधिक लोकांना ताब्यात घेतले आहेत. याचे पडसाद उग्र स्वरूपात पुण्यात पडल्याने आता केंद्र सरकारने पीएफ आयवर पाच वर्षाची बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील स्वागत केले आहे. यावर आता भाजप नेते किरीट सोमय्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
“देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचे मनापासून आभार”; एकनाथ शिंदे
पीएफआय वर प्रतिबंध लावल्याुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आम्ही धन्यवाद देतो. या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून काही दिवसांपुर्वी पुण्यात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या होत्या. अरब देशांतून पीएफआयला टेरर फंडिंग मिळत होतं. या संस्थेकडून ज्या काही देशद्रोही कारवाया केल्या असतील, त्यावर कारवाई होणार म्हणजे होणार असं किरीट सोमय्यांनी म्हटलं आहे.
पीएफआय व तिच्या सहयोगी संघटना गंभीर गुन्हांमध्ये सहभागी असल्याने तपास यंत्रणांनी केलेल्या चौकशीत आढळून आले आहे. दहशतवादी कारवाया तसेच त्याला अर्थ पुरवठा करणे, भीषण हत्या, देशाच्या घटनात्मक व्यवस्थेचा अवमान करणे, सार्वजनिक सुव्यवस्था बिघडवणे, देशाची अखंडता, सुरक्षा आणि सार्वभौमत्वाला बाधा आणण्यासाठी ही संघटना सक्रीय झाली होती. या संघटनेचा पुण्यासारख्या शहरात देखील घातपात घडवून आणण्याचा कट समोर आलं होतं.
“कितीही अफजल खान आले तरी मी घाबरणार नाही”; ठाकरेंचा शहांवर अप्रत्यक्ष निशाणा
महाराष्ट्रतील पुण्यासारख्या महानगरात त्यांच्यावरील कारवाईविरोधात आंदोलन करून वातावरण बिघडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पोलिसांनी तो वेळीच हाणून पाडला. देशविघातक कृत्य करून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या समाजकंटकांचे मनसुबे राज्यात कधीच यशस्वी होणार नाही, असं मुख्यमंत्री एकनात शिंदे यांनी म्हटलं आहे.
Read also
- “खडसे, तावडे, मुंडेंनंतर आता फडणवीस गिरीश महाजनांचाही राजकीय काटा काढणार”?
- “माझा पक्ष, विचार वेगळे पण मी पंकजा मुंडेंच्या पाठीशी”; रूपाली पाटील
- “मोदींनी जरी ठरवलं तर ते मला संपवू शकत नाही”; पंकजा मुंडेच्या वक्तव्यानंतर राज्यात खळबळ
- “त्यांची आता जळजळ, मळमळ, कळकळ सुरूय”; भाजपचं शिवसेनेला प्रत्युत्तर
- “कमळाबाईच्या मराठी दांडियाने इंचभरही हलणार नाही”; सेनेकडून भाजपचा पुन्हा एकदा ‘कमळाबाई’ उल्लेख