नागपूर : आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा सोलापूर दौरा रद्द झाला. दुसरीकडे, खासदार सुप्रिया सुळे सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार राज्याच्या दौऱ्यावर निघणार असल्याची त्यांनी माहिती दिली. त्यामुळे, एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना, आता शरद पवारांचा दौरा निघणार असल्याने, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे, तर राष्ट्रवादीच्या गोटात नवचैतन्य निर्माण झाले आहे.
संजय राऊतांवर चंद्रकांत पाटलांचा जोरदार प्रहार, अनिल परबांनाही दिला इशारा
याविषयी माहिती देताना सुप्रिया सुळे यांनी, “साहेब घरात कमी आणि दौऱ्यावर जास्त असतात. राज्यात महामारीमुळे ४५० पेक्षा जास्त मुले अनाथ झाली आहेत. त्यांच्या शिक्षणासाठी राष्ट्रवादी जीवलग मित्र काम करणार आहेत. त्या अनाथ झालेल्या मुलांपैकी काही अल्पवयीन मुलींच्या लग्नाचा घाट घातला जात आहे. हे सगळं थांबायला हवं यासाठी देखील ‘राष्ट्रवादी जीवलग’ काम करणार आहेत. आता या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे,” असं त्यांनी स्पष्ट केलं.
जोर का झटका : नारायण राणे यांना बसला विजेचा शॉक, सुदैवाने कोणतीही गंभीर दुखापत नाही
तसेच, “मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकत्र निवडणूकीबाबत महाविकास आघाडीचे नेते मिळून निर्णय घेणार आहेत. चार प्रभाग पद्धत बाद झाल्याने फायदा तोट्याचा प्रश्न नाही. आम्ही निवडणूकीत पक्षातील सर्वांना एकत्र घेऊन चालणार आहोत,’ असं त्या म्हणाल्या. तसेच, कालच्या राज्य सरकारच्या ओबीसी बैठकीत सर्वांचं एकमत होतं. मात्र दुसरीकडे, काल देवेंद्र फडणवीस एक बोलले आणि आज बावनकुळे वेगळं बोलले. यावरून आरक्षणाच्या बाबतीत त्यांच्या पक्षात मतभेद आहेत,” असा टोला त्यांनी लगावला.
“त्या एका व्यक्तीमुळे भाजप-शिवसेनेचं २५ वर्षाचं नातं बिघडलं,” संजय राऊतांकडून नाव जाहीर
दरम्यान, सकाळी मुख्यमंत्री-फडणवीस भेटीवर भाष्य करताना, “मी इम्पल्सीव्ह नाहीये. शिवसेना-भाजपचे नेते भेटले की लगेच युती व्हायला, ती इन्स्टंट कॉफी नाही आणि मी अशा घटनांवर तातडीने प्रतिक्रिया द्यायला माझं आयुष्य काही ब्रेकिंग न्यूज नाही. मला विचार करण्यासाठी वेळ लागतो. पण राजकीय विचारसरणी बाजूला ठेऊन नेत्यांच्या भेटीगाठी होत असतील, तर त्याचं स्वागतच आहे,” असं म्हणत त्यांनी फुग्यातील हवा काढली.
Read Also :
- मी न घाबरणारा मराठा! छोटेखानी भाषणात ऍड. उज्ज्वल निकम यांचे उद्गार
- राजनाथ सिंग यांचे महाराजांवरचे ‘ते’ वक्तव्य वादात, कोल्हेंकडून निषेध तर संभाजी ब्रिगेडची माफीची मागणी
- ओबीसी बैठकीला ‘वांझोटी बैठक’ म्हणणाऱ्यांना विजय वडेट्टीवारांनी सुनावले
- “…याचा अर्थ त्या कारवाया सूडभावनेने”, नवाब मलिक यांचा भाजपवर हल्लाबोल
- “अजून एखादा ‘करेक्ट’ कार्यक्रम करून टाकू”, संजय राऊतांचा सूचक इशारा