नागपूर : राज्याच्या विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन मागच्या आठवड्यात वादळी ठरलं. विविध मुद्यांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी बघायला मिळाली. तर अधिवेशन सुरू होण्याच्या सुरूवातीला विरोधक प्रत्येक दिवशी पायऱ्यांवरच जोरदार घोषणाबाजी देत आहेत. यातच सभागृहात देखील याचे पडसाद मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. याच राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार आपली जबाबदारी व्यवस्थितरित्या संभाळतांना दिसत आहेत. यावरून मनसेचे नेते गजानन काळे यांनी ट्विट केला आहे.
“तर कृषीमंत्र्याला सभागृहात बसण्याचा अधिकार नाही, फौजदारी गुन्हा दाखल करा”
गजानन काळे यांनी याबाबत एक ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की, राज्य सरकारला टोकाचा नाही तर नाममात्र विरोध करणारा सच्चा विरोधी पक्ष नेता अजित दादांच्या रूपात पहिल्यांदाच महाराष्ट्राने पाहिला. ही राष्ट्रवादीची भूमिका आहे की दादांची या संभ्रमात मविआचे नेते, आमदार आणि घड्याळ कार्यकर्ते. बाकी अजित दादा जोमात आणि महाविकास आघाडी कोमात, असा टोलाही त्यांनी हाणला आहे.
सोमय्यांकडून शरद पवारांचं कौतुक, म्हणाले, “मी त्यांच्याकडून एक गुण घेतलाय, तुम्हीही घ्या”
दिशा सालियन प्रकरणावरून विधानसभेत मोठा राडा झाला. या मोठ्या गदारोळात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांना निलंबित करण्यात आले. यावरून अजित दादांनी कोणतेही आक्रमक भूमिका न घेता याप्रकरणावरून दिलगिरी व्यक्त केली होती. तसेच अनेक घटनांवरून अजित पवार यांनी आपल्या कामाची चुणूक दाखवून दिली आहे.
राज्य सरकारला टोकाचा नाही तर नाममात्र विरोध करणारा “सच्चा” विरोधीपक्ष नेता अजित दादांच्या रुपात पहिल्यांदाच महाराष्ट्राने पाहिला …
ही राष्ट्रवादीची भूमिका आहे की अजित दादांची या संभ्रमात मविआचे नेते,आमदार आणि घड्याळ कार्यकर्ते ..
बाकी अजित दादा जोमात आणि महाविकास आघाडी कोमात pic.twitter.com/jreelIqnXu— Gajanan Kale (@GajananKaleMNS) December 27, 2022
Read also
- अन्यथा पुणे महापालिका जिंकणे भाजपला अवघड जाईल..! भाजप नेत्यांचं सुचक विधान
- रूपाली पाटील आमदार होण्याच्या वाटेवर, कसबा मतदार संघातून पोटनिवडणुक लढवणार?
- विधानभवनावर ‘आप’चा धडक महामोर्चा, विविध मागण्यांसाठी दिले निवेदन
- “तरूणाला शिव्या देत जबरदस्त मारहाण, शिंदे सरकारमधील आणखी एक मंत्री अडचणीत”
- “तसं सत्ताधाऱ्यांचं झालंय”, अन् रोहित पवारांनी तो व्हिडिओ ट्विट करत साधला निशाणा