मुंबई: नीरा देवघर प्रकल्पामुळे अनेक शेतकऱ्यांना आपल्या जमिनी गमवाव्या लागल्या आहेत. त्यामुळे नीरा देवघर प्रकल्पातील पात्र असणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या हक्काच्या जमिनी मिळवून देण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी असे निर्देश राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिले आहेत. धोमबलकवाडी, नीरा देवघर प्रकल्प, भाटघर धरण या प्रकल्पासंबंधीच्या विविध प्रश्नांबाबत विधानपरिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या उपस्थिती नुकतीच विधानभवनात याबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. याबाबत सविस्तर चर्चा केल्यानंतर जयंत पाटील यांनी निर्देश दिले आहेत.
हे पण वाचा, ‘अजितदादा म्हणतात कोण लाल आहे जो सरकार पाडेल, मी म्हणतो तो लाल अजित पवारच आहेत’
हे पण वाचा, ‘नागरिकांसोबत मग्रुरी अजिबात खपवून घेतली जाणार नाही’
धोमबलकवाडी, नीरा देवघर प्रकल्प, भाटघर धरण या प्रकल्पासंबंधीच्या विविध प्रश्नांबाबत विधानभवनात आयोजित बैठकीत जयंत पाटील म्हणाले की प्रकल्पासाठी संपादन केलेल्या जमिनीच्या बदल्यात संबंधित प्रकल्पग्रस्तांना जमिनी देण्यास आपला विभाग बांधील असतो. तो त्यांचा मूलभूत हक्क देखील आहे. त्यामुळे नीरा देवघर प्रकल्पातील ज्या पात्र प्रकल्पग्रस्तांना जमिनी अद्याप दिलेल्या गेल्या नाहीत त्यांना त्या लवकरात लवकर मिळतील यासाठी तातडीने कारवाई करा. अधिकाऱ्यांकडून कर्तव्याबाबत कसूर होत असेल तर त्यांना देखील करणे दाखवा नोटीस पाठवा.
हे पण वाचा, पुणे पुन्हा पूर्वपदावर! सोमवारपासून पुणेकरांसाठी लागू होणार हे नवीन नियम”
हे पण वाचा, अजूनही वेळ गेली नाही, अडीच वर्षांच्या मुख्यमंत्री पदाचा उद्धव ठाकरेंनी विचार करावा!’
१९९९ सालापासून देवघर निरा प्रकल्पातील ३०० हून अधिक प्रकल्पग्रस्तांना अद्याप आमच्या हक्काच्या जमिनी मिळाल्या नाहीत . मात्र त्यावर तोडगा काढण्यासाठी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना बैठकीस बोलावून त्यावर तोडगा काढून आम्हाला हक्काच्या जमिनी मिळवून देण्यासाठी सकारात्मक पाऊल उचललं . त्याबद्दल प्रकल्पग्रस्त शेतकरी आनंदा डेरे , महाराष्ट्र कृष्णा खोरे प्रकल्पग्रस्त विकास संस्था निरा देवघरचे सचिव प्रकाश साळेकर , कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर दिघे , संघटक संजय माने व लक्ष्मण पावगी यांनी राज्यसरकारचे आभार मानले आहेत.
हे पण वाचा,
प्राधिकरण पीएमआरडीएमध्ये विलिन करण्याच्या आघाडी सरकारच्या निर्णयाविरोधात एकवटली भाजप
प्राधिकरणाचा उद्देश साध्य झालेला नाही; भाजपच्या राम-लक्ष्मणाची जोडी कोर्टात जाणार
अजित पवारांकडून आमदार महेश लांडगेंच्या व्हिजन 2020 ला ब्रेक
‘प्राधिकरण विलिनीकरणाच्या अन्यायकारक निर्णयामुळे पिंपरी चिंचवडकरांचे भरुन न काढण्यासारखे नुकसान’