मुंबई : एसटी आंदोलनात मोर्चेकरांना चेतावल्याप्रकरणी पाच वर्षासाठी वकिलाची सनद रद्द झालेले गुणरत्न सदावर्ते चांगलेच चर्चेत आले आहेत. स्टेट ट्रान्सपोर्ट को. ऑपरेटिव्ह लि. बॅंकेच्या निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर नथूराम गोडसेचे उदात्तीकरण करताना सदावर्ते दिसत आहेत. सदावर्तेंनी पाम्पलेटवर नथूराम गोडसेचेही पोस्टर लावले आहेत. यावरून आता राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी हल्लाबोल केला आहे.
हेही वाचा…“रोहित पवारांना नोटीस का आली ? याबद्दल माझ्या मनात 100 टक्के..,” आव्हाडांचा रोख नेमका कुणाकडे ?
राज्य सरकारने गोडसेचे उदात्तीकरण करणाऱ्या सदावर्तेवर तात्काळ कारवाई करावी. राज्यात महायुती सरकार आल्यापासून देशाच्या राष्ट्रपित्याची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेचे उद्दातीकरण सुरू आहे. सदावर्ते सारखी संघाची पिलावळ महात्मा गांधी यांचा अपमान करत आहे, तरी त्याच्यावर कारवाई का होत नाही? स्टेट ट्रान्सपोर्ट को ऑपरेटिव्ह बँकेच्या वार्षिक अहवालवर नथुराम गोडसेचा फोटो छापण्याची हिंमत यांची झालीच कशी ? सत्ताधारी भाजपचा हात असल्याशिवाय ही पिलावळ अशी गरळ ओकू शकत नाहीत आणि इतका माज करू शकत नाही. आजच्या घडीला एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची असणारी बँक भाजपच्या आशीर्वादाचे धनी असलेल्या सदावर्ते सारख्या भ्रष्टाचाऱ्यामुळे अडचणीत आली आहे. असं विजय वडेट्टीवारांनी म्हटलंय.
हेही वाचा…“शरद पवारांचा विचार नथुराम गोडसे यांच्या पायाच्या धुळी इतका सुद्धा नाही,” गुणरत्ने सदावर्तेंची जोरदार टिका
यातच सदावर्तेंनी शरद पवारांवरही जहरी टिका केली आहे. ज्याप्रकारे शरद पवारांच्या विचारांना जसं झोडपून काढलं, तसंच त्यांच्या बगलबच्च्याना झोडपून हाकूलून लावले आहे. अखंड भारताचे भाग्यविधाते नथुरामजी गोडसे यांची भूमिका प्रत्येक भारतीय काळजात ठेवून आहे. गांधीजींचा विचार आता काही शिल्लक राहिलेला नाही. अखंड भारताचा विचार शिल्लक आहे. पाकिस्तानधार्जिना विचार शिल्लक नाही. म्हणून असे विचार काँग्रेस कधीही संपवू शकणार नाही. शरद पवारांचा विचार सुद्धा नथुरामजी गोडसे यांच्या पायाच्या धुळी इतका सुद्धा नाही. असा घणाघात देखील गुणरत्ने सदावर्तेनी केला आहे.
हेही वाचा…मोठी बातमी..! सुप्रीम कोर्टात विधानसभा अध्यक्षांविरोधात ठाकरे गटाची याचिका? सुनावणीकडे लक्ष
दरम्यान, पुढे बोलतांना ते म्हणाले की, आमसभेत शरद पवारांचे बगलबच्चे गदारोळ सोडा, तोंडातून शब्दसुद्धा काढू शकले नाहीत. कष्टकरी जय श्रीराम, वंदे मातरम म्हणत होते. स्वतःला कामगार म्हणवून घेणाऱ्या संघटनेची घाणेरडी कृती आहे. ज्या अहवालावर प्रभू श्री रामचंद्रांचा फोटो आहे, ज्या अहवालावरती हिंदू राष्ट्र भारत लिहले, त्या अहवालाला हात लावण्याचा प्रयत्न केला म्हणून संघटनेच्या संदीप शिंदे याला झोडपून बाहेर काढला.
गोडसेचे उदात्तीकरण करणाऱ्या सदावर्तेवर राज्य सरकारने तात्काळ कारवाई करावी.
राज्यात महायुती सरकार आल्यापासून देशाच्या राष्ट्रपित्याची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेचे उद्दातीकरण सुरू आहे.
सदावर्ते सारखी संघाची पिलावळ महात्मा गांधी यांचा अपमान करत आहे तरी त्याच्यावर कारवाई का होत… pic.twitter.com/M6ji91Og5S
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) September 29, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“मलाही मुंबईत घर घेण्यास अडचण आली”, पंकजा मुंडेंनी सांगितल्या ‘त्या’ आठवणी
हेही वाचा…” छगन भुजबळ जेलमध्ये असताना शरद पवारांना ब्लॅकमेल करायचे,” राष्ट्रवादीच्या माजी आमदाराचा मोठा गौप्यस्फोट
हेही वाचा…“पुन्हा हे असं घडलं तर गालावर वळ उठतील,” मुंलूंडच्या घटनेवरून राज ठाकरेंचा इशारा
हेही वाचा…रोहित पवारांच्या ‘बारामती ॲग्रो’ला नोटीस, ‘बारामती ॲग्रो’ नेमकी काय आहे ? वाचा सविस्तर
हेही वाचा…‘या’ तीन मुख्यमंत्र्यांचा पत्ता कट होणार, भाजप विधानसभेच्या निवडणुकांमध्ये धक्कातंत्राचा वापर करणार