मुंबई : उत्तर प्रदेश, मणिपुर, उत्तराखंड आणि गोव्यात भाजप सत्ता राखण्यास यशस्वी झाला आहे. त्यामुळे देशभरात भाजप कर्तकर्त्यांकडून जल्लोष व्यक्त केला जात आहे. अशातच आता गोव्यात महत्वाची जबाबदारी पार पाडलेल्या देवेंद्र फडणवीस यांचा मुंबईत सत्कार करण्यात आला. त्यावेळी भाजप आमदार गोपीचंद फडळकर यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार निशणा निशाणा साधला.
विधानसभा निवडणुकीत काॅंग्रेसचा सुपडा साप! राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया
गोपीचंद फडळकर यांना शरद पवार यांच्याबद्दल विचारले असता, त्यावेळी ते म्हणाले की, शरद पवार हे ज्येष्ठ आहेत परंतु श्रेष्ठ नाहीत. काही जरी केलं तरी मीच केलं, कोणी माझ्या पुढे जाऊ नये अशी त्यांची भूमिका आहे. परंतु देवेंद्र फडणवीस असे 10-20 पवार खिशात घालून फिरतात. असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. तसेच त्यांनी पुढे म्हणाले की, त्यांच्यापेक्षा कितीतरी प्रगल्भ नेतृत्व फडणवीसांचं आहे.
मोदी-योगींच्या ‘व्हीजन ऑफ डेव्हलपमेंट’ला देशवासीयांची साथ : आमदार महेश लांडगे
गोपीचंद पडळकर यांनी यावेळी शरद पवार यांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्य देखील केले आहे. फक्त विश्वासघातकीपणा, गद्दारीपणा, लबाडीपणा, राष्ट्राच्या विरोधात भूमिका जी शरद पवारांकडे आहे तसले विषय सोडून त्यांच्या पुढचं नेतृत्व करण्याची ताकद देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
मोदी-योगींच्या ‘व्हीजन ऑफ डेव्हलपमेंट’ला देशवासीयांची साथ : आमदार महेश लांडगे
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर शरद पवार यांनी भाजपला पर्याय देण्यासाठी समान कार्यक्रमावर चर्चा करण्याचं विधानं केलं होतं. भाजपला फक्त पंजाबमध्ये सरकार स्थापन करण्यापासून दुर राहिला आहे. इतर ठिकाणी भाजप सत्ता राखण्यास कायम राहिला आहे.
Read also:
- लोकसभा निवडणुकीत शिवसेनेची अवस्था काॅंग्रेससारखी होईल, त्यांनी भाजपसोबत यावे रामदास आठवले
- भाजपची कोणतीही लाट किंवा वादळ नाही! अमोल मिटकरींची भाजपवर खरमरीत टीका
- महाराष्ट्रातील सत्तांतर अटळ, महाराष्ट्रात पर्यायी सरकार देऊ : देवेंद्र फडणवीस
- महाराष्ट्रातील सरकार लवकरच पडणार! काॅंग्रेस खासदार कुमार केतकर यांचं वक्तव्य
- आता पुढचं टार्गेट महानगरपालिका! विधानसभा निवडणुका निकालानंतर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया