नागपूर : राज्यातील अंत्योदय रेशनकार्डवर वर्षातून एक साडी मोफत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्य यंत्रमाग महामंडळामार्फत ही योजना राबविली जात आहे. या योजनेसाठी साड्यांचे उत्पादन, जाहिरात, वाहतूक खर्च, गोदामात साठवणूक, हमाली हा सर्व खर्च राज्य सरकार महामंडळाला देणार आहे. मात्र काहि ठिकाणी महिलांना मछरदाणी तर काही ठिकाणी फाटलेल्या साड्या वाटण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. तसेच काही ठिकाणी तर या साड्यांची क्लालिटी खुपच खराब असून त्या महिलांना वापरताही येणे शक्य नाही. यावरून राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर जोरदार टिका केलीय.
हेही वाचा….‘निवडणुकीला उभं राहू नका, भाजपकडून विरोधी नेत्यांना धमकी,” शरद पवारांचा भाजपवर गंभीर आरोप
वडेट्टीवार म्हणाले की, २३-२४ या वर्षासाठी राज्य सरकारने महामंडळास प्रत्येकी साडी ३५५ रूपये दिले आहे. स्वस्त धान्य दुकानातून या साड्यांचे वाटप होत आहे. या साड्यांच्या निमित्ताने महिलांना या सरकारने रांगेत लावले. इतका सारा त्रास सहन करून हाती आलेल्या साड्या पाहिल्या तर काय त्या फाटक्या आणि कुचक्या निघाल्या. यवतमाळ जिल्ह्याच्या झरी, कळंब, मारेगावसह अनेकानेक तालुक्यांत या घटना समोर आल्या. या महिलांनी स्वस्त धान्य दुकानात जाऊन साड्या परत करण्याचा प्रयत्न केला. तर दुकानदार म्हणतो, ‘फुकटच्या साड्यांची गॅरंटी नसते.’
हेही वाचा…निवडणुकीपुर्वी जळगावात भाजपला मोठा धक्का, ‘हा’ बडा नेता ठाकरे गटात दाखल
कुठल्याच गोष्टींची गॅरंटी नाही हीच मोदींची गॅरंटी आहे. म्हणून तर दोन दिवसांपूर्वी नागपुरातील रेशीमबागेत महिला कामगारांना किटन किट वाटपाच्या नाराखाली रांगेत लावले. सर्व्हर डाऊन झाल्याचे सांगून वाटप बंद केले. सरकारचा फोलपणा लक्षात आल्याने कामगार महिला चिडल्या. संतापल्या..! चेंगराचेंगरी झाली आणि एका मायमाऊलीचा जीव गेला. दुसऱ्या दिवशी वाटप बंद केले. कुठे रेशनवर मायमाऊलींना फाटक्या साड्या दिल्या जातात, कुठे किचन किटच्या नावावर जीव जातात. जाहिरातबाजीसाठी महिला भगिनींची चेष्ठा का ? असा सवालही त्यांनी केलाय.
फुकटच्या साड्यांची गॅरंटी नसते!
तर मग देता कशाला ?
गरीब महिला भगिनींची चेष्टा करायला?राज्यातील अंत्योदय रेशनकार्डवर वर्षातून एक साडी मोफत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. राज्य यंत्रमाग महामंडळामार्फत ही योजना राबविली जात आहे. या योजनेसाठी साड्यांचे उत्पादन, जाहिरात,… pic.twitter.com/5xCKFLyPo5
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) March 12, 2024
READ ALSO :
हेही वाचाभाजपची दुसरी यादी..! लोकसभेसाठी मुंडे, मुनगंटीवार अन् भारती पवारांच्या नावांची घोषणा होणार ?
हेही वाचा…“ज्या दिवशी भाजपला धोका देईल, त्या दिवशी….” महादेव जानकरांनी पुन्हा भाजपला दिला इशारा
हेही वाचाशिंदे साहेब शिवतारेंना आवरा, अजित पवारांवर केलेली टिका राष्ट्रवादीला भोवली
हेही वाचा.मराठा आंदोलनाबाबत SIT स्थापन, नाशिकचे पोलिस आयुक्त करणार चौकशी, महत्वाची माहिती येणार समोर
हेही वाचा…ठाकरेंची सांगलीत ताकद वाढली, डबल महाराष्ट्र केसरी ठाकरे गटात दाखल, निवडणुकीच्या रिंगणात उतरणार