मुंबई : विधानसभेत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पेन ड्राईव्ह म्हणून पुरावा सादर केल्याने एकच खळबळ उडाली. त्यात महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांच्या भ्रष्टाचारांची माहिती असल्याचे फडणवीसांनी सांगितलं. देवेंद्र फडणवीस यांनी आता पुन्हा एकदा राज्य सरकारविरोधात पुरावा म्हणून पेन ड्राईव्ह सादर केला आहे. त्यावरून आता शिवसेनेचे खासदास संजय राऊत यांनी त्यांना चांगलाचं टोला लगावला आहे.
“मुंबई सोन्याचं अंड देणारी कोंबडी, त्यात ३०० आमदारांना घरं बांधणार”: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
ते म्हणाले की, यांच्या घरात पेनड्राईव्ह रोज बाळंत होतात का ते आता बघावं लागणार आहे. हा पेन ड्राईव्ह, तो पेन ड्राईव्ह. त्यावर आम्ही एकच कव्हर ड्राईव्ह मारू. रोज एक भंपक आणि खोटं प्रकरण तयार करतात. हे बाळंतपण फक्त त्यांनाच जमतं. महाराष्ट्रात हे नवीन नाही. यांनी पेनड्राईव्हची फॅक्टरी काढली आहे का? केंद्रीय चौकशी समिती आणि यांची मिलिभगत आहे. असा टोला देखील त्यांनी लगावला.
आमदार महेश लांडगे यांचं वीज समस्याबाबत विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन
मी पेनड्राईव्ह दिल्यावर लोकांना राग येतोय मात्र त्या दिवशी लागलेल्या लाईनचाही पेनड्राईव्ह मी द्यायला तयार आहे. सोलापूरात एक सचिन वाझे दर महिन्याला लाखो रूपये गोळा करत आहे. धुळ्याच्या उपनिबंधकाला वरीष्ट लिपीकाने लाच मागितली. तक्रारी केल्यानंतर सभागृहात बोलणाऱ्या आमदारांना खुन्नस धरतात. राऊत अपक्ष निवडणून आल्याने कारवाई होत नाही. याचं गृहराज्यमंंत्र्यांनी छातीवर हात ठेवून बैठकीत काय झालं सांगावं. मविआचा अर्थ महाविनाश, महावसुली आणि मद्यविक्री आघाडी असा आहे, असा हल्ला देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत राज्य सरकारविरोधात चढवला.
ईमानदारी और सच्चाई का डर होना जरूरी है; जितेंद्र आव्हाडांना चंद्रकांत पाटलांचा टोला
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, शिवसेना पदाधिकारी रघुनाथ कुचेंना बलात्काराचा आरोप होऊन अटक नाही झाली. चक्क आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्याचे बनावट आदेश काढले. अजित पवारांचा नंबर फोर्च करून खंडणी मागितली. करायचा तर दुसऱ्या कुणाचा तर करायचा, पण अजित दादांचा का? फेक माथाडीची पुणे जिल्ह्यात मोठी वसुली सुरू असल्याने पुण्यातले उद्योग धास्तावले आहेत.
Read also:
- कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीची रंगत वाढली; निवडणुकीसाठी तब्ब्ल २७ अर्ज दाखल
- “माझ्या शरीरात इंक टाकून हत्येचा कट रचला”; विधानसभेत नितेश राणेंचे सरकारवर धक्कादायक आरोप
- कोणीही ऐरे गैऱ्यांनी मागणी करून नार्को टेस्ट होत नाही; चित्रा वाघ यांचा चाकणकरांना टोला
- “महाविनाश, महावसुली अन् मद्यविक्री” ; सरकारविरोधात फडणवीसांनी आरोपांची गरळ ओकली
- मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ वक्तव्याला फडणवीसांचं प्रत्युत्तर; म्हणाले, ते पालिकेला सोन्याचं अंड देणारी कोंबडी समजतात