पुणे : राज्यात सध्या राजकीय सभांचा धुराळा उडाला आहे. या राजकीय सभांमधून राजकीय नेते एकमेकांवर चिखल फेक करताना दिसत आहे. अलिकडेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा पार पडली. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची सभा मुंबईत पार पडली. अशातच राज ठाकरे यांची 21 मे रोजी पुण्यात होत आहे. त्या सभेला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी देखील हिरवा कंदील दिला आहे.
“यांना रावणांची देखील उपमा देऊ शकत नाही”, नारायण राणेंची मुख्यमंत्र्यांवर बोचरी टिका
राज ठाकरे यांची पुण्यातील सभा डेक्कन जिमखान्याच्या परिसरातील मुठा नदीपात्रात घेण्याचे नियोजन आहे. त्यासाठी मनसेकडून वेगाने हालचाली देखील सुरू आहेत. याठिकाणी सभा घेतल्यास वाहतुक कोंडी प्रश्न निर्माण होणार नाही. तसेच याठिकाणी स्टेज, बॅरिकेट आणि विद्युत व्यवस्थेसाठी मनोरे उभारण्यासाठी परवानगी द्यावी, तसेच स्पीकरच्या वापरासाठी परवानगी द्यावीस असे निवेदन मनसेकडून डेक्कन जिमखाना पोलीस ठाण्यात देण्यात आलं आहे.
राज ठाकरे यांच्या पुण्यातील सभेला परवानगी नाकारण्याचे कारण दिसत नाही. पोलीस आयुक्त या सभेला परवानगी देतील. मात्र मनसेने पोलीस आयुक्तांनी घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, अशा सुचना दिलीप वळसे पाटील यांनी दिल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर मनसेचे शहारध्यक्ष साईनाथ बाबर आणि मनसे नेते बाबु वागस्कर हे राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी रवाना झाले आहेत.
“आहो तुमचे नेतेच बहिरे झाले आहेत आधी त्यांना पहा”, चंद्रकांत खैरे यांचा फडणवीसांवर पलटवार
दरम्यान, अलिकडील सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांचा उल्लेख मुन्नाभाई केला होता. हिंदुत्वाच्या भूमिकेवरून देखील मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला होता. त्यामुळे आगामी सभेत यावरून मुख्यमंत्र्यांवर जोरदार हल्लाबोल करण्याची शक्यता आहे. तसेच मशिदीवरील भोंग्यासंदर्भात जे आंदोलन झालेत. त्या आंदोलनात मनसेच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. त्यावर देखील भाष्य करण्याची शक्यता आहे.
Read also:
- “महागाईमुळे सध्या आमच्या घरात लिंबू सरबत बनतच नाही”; सुप्रिया सुळे
- ज्या ठिकाणी पाऊस होणार नाही, तिथे निवडणुका घ्या; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
- ‘…आणि म्हणूनच धर्मवीर चित्रपटाचा शेवट उद्धव ठाकरेंनी पाहिला नाही’; नितेश राणेंची खोचक टीका
- क्योंकी गॅस भी कभी सस्ती थी, स्मृती जी याद है ना; स्मृती इराणीविरोधात राष्ट्रवादीचा मोठा राडा
- “शिवसंपर्क अभियान नव्हतं तर शिव्या संपर्क भाषण होतं”