मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्यांच्या पत्रकार परिषदेनंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. किरीट सोमय्या यांच्याबाबत नाट्य म्हणणे म्हणजे मराठी रंगभूमीचा अपमान आहे, अशी प्रतिक्रिया राऊतांनी दिली आहे.
मुश्रिफांचा घोटाळा दाबण्यासाठी सोमय्यांना घरातून अटक करण्याचे आदेश?
केंद्र सरकारच्या पाठिंब्यावर महाविकास आघाडी खिळखिळी करण्यात येत आहे. गृह मंत्रालयानं केलेली कारवाई कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी करण्यात आली. मुख्यमंत्री यांच्या आदेशानुसार झालं असं म्हणणं चुकीचं असल्याचंही संजय राऊत म्हणाले आहेत. आरोप करण्याचे पुरावे असतील तर पोलीस दल किंवा इतर संस्था यांच्या पुरावे द्यावे. केंद्र सरकारच्या आदेशानं अस करत असाल तर गृह मंत्रालयाचं कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम आहे. मुख्यमंत्री कार्यालयाचा संबध नाही, असं स्पष्ट मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे. मुख्यमंत्री आणि कोणाचेही काय पहायचे असेल त्यांनी मंगळावर चंद्रावर जाऊन पाहावं लोकशाही आहे. पण केंद्र सरकारच्या सूचनेनुसार ते जे करत आहे आरोप करणे ही फॅशन झाली आहे, असा टोला ही संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांना लगावला आहे.
राष्ट्रवादीच्या विळख्यातून बीडला मुक्ती देऊ! प्रीतम मुंडेंचा निर्धार
मुख्यमंत्री तुम्ही भगवा सोडून हिरवा धारण करा. पण आम्हाला आमच्या सण साजरे करू द्या, असं किरीट सोमय्यांनी म्हटलं. यावरही संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे. भगवा सोडून हिरवा रंग जवळ केला की नाही त्यांना लवकरच कळेल. आपलं अंतरंग पहावा, असं राऊत म्हणालेत. आरोप करून अनेक नेत्यावर दबाव केंद्राकडून आणला जातो. हसन मुश्रीफ यांनी आवाहन स्वीकारलं आहे. आम्ही डरपोक नाही. आम्ही झुकणारं नाही. अनेक मंत्री केंद्रात आहे असे आरोप भाजपने केले होते ते हरिश्चंद्र म्हणून नावाला आले, असा हल्लाबोलही संजय राऊत केला आहे.
Read Also :
- भाजपात प्रवेश करण्यासाठी चंद्रकांत पाटीलांनी मला ऑफर दिलीयं; हसन मुश्रीफांचा गौप्यस्फोट
- राष्ट्रवादीच्या गुंडांनी माझ्या केसालाही धक्का लावला तर दुसऱ्या दिवशी सरकार पाडेल – सोमय्या
- किरीट सोमय्याला कराडमध्ये पोलिसांनी घेतले ताब्यात; रेल्वे स्थानकावर केली कारवाई
- भाजप सोमय्या यांच्या पाठीशी, त्यांचा आवाज दडपता येणार नाही!
- राज्य मंत्री नाही, तर प्रणिती शिंदे कॅबिनेट मंत्री होणार?