मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच गढूळ झालं आहे. शिवसेनेचे नेते बंडखोर आमदारांवर तुटून पडताहेत. तर आपल्या जाहीर सभांमधून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर देखील कडाडून टिका केली जात आहे. यातच आता खोक्यांचा राजकारण देखील मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यावरून मनसेने उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
“महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होण्याचा मान नेमका कुणाला मिळणार”?
मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर टिका करताना मातोश्री 2 कशी तयार झाली, तसेच 126 कोटी बापाकडे अन् 11 कोटी पोरांकडे कसे आलेत? असा खोचक सवाल केला आहे. तसेच हे धंदा करत होते, काय करत होते? कशाला बोलताय, असं देखील प्रकाश महाजन यांनी म्हटलं आहे.
“जितका चिखल, तितकेच कमळ अधिक फुलणार”; नरेंद्र मोदींचा काॅंग्रेसला प्रत्युत्तर
सुषमा अंधारे यांनी राज ठाकरे यांच्यावर बीड येथे टीका केली होती. इतके वर्ष महापालिकेत सत्ता असूनही मातोश्रीवर मजला चढला नाही. पण कृष्णकुंजच्या बाजूला आपार्टमेंट झालं असा आरोप सुषमा अंधारे यांनी मनसेवर केला होता. त्यावर प्रकाश महाजन यांनी सुषमा अंधारे यांच्यावर जहरी टीका केली आहे.
“उद्धव ठाकरे आणखी 2.5 वर्ष राहिले असते, तर त्यांचे केवळ 20 आमदारचं निवडून आले असते”
दरम्यान, आज कल कुणीही उठतं आणि राज ठाकरे साहेबांवर टिका करीत आहे. काल आमच्या पक्षात असलेली रूपाली पाटील देखील टिका करू लागली आहे. राज ठाकरे कधीही दुसऱ्यांच्या ओजळींने पाणी पीत नाहीत. तसेच काल देखील सुषमा अंधारे यांची बीडमधील सभा पाहिली. तिला बोलायला ठेवलंय, भुंकायला नाही. मेंदूला तिच्या नारू झाला का ? अशी टिका मनसे नेते प्रकाश महाजन यांनी केली आहे. सुषमा अंधारे यांनी बीडमधील टिकेला त्यांनी पुण्यात उत्तर दिलं आहे. त्यामुळे आता मनसे आणि शिवसेना, राष्ट्रवादी यांच्यातील वाद दिवसेंदिवस वाढत चालला आहे.
Read also
- “घरच्या कार्यक्रमाला जायला निमंत्रण कशाला लागते”; शिवेंद्रसिंह राजे
- “बाबासाहेब पुरंदरेंच्या विकृत व अनैतिहासिक मांडणीवर…!” राज ठाकरेंच्या भेटीनंतर जयसिंगराव पवारांचा मोठा खुलासा
- “या बाईंमुळे, उद्धव ठाकरेंना आता महिलांच्या बंडालाही सामाेरं जावं लागणार”
- “बोलायला ठेवलंय, भूंकायला नाही, राज ठाकरेंवर टिका करण्याअगोदर मालकाला विचारा”
- “शरद पवार साहेबांचे नाव घेतले की, ती बातमी होते”; अजित पवारांचा राज ठाकरेंना टोला