मुंबई : देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा आगामी महिन्यात बिगूल वाजणार आहे. मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोरम राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांकडे लोकसभा निवडणुकीची लिटमट टेस्ट म्हणून पाहिली जात असल्याने सत्ताधारी आणि विरोधकांनी चांगलीच कंबर कसली आहे. यातच आता तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील दोन बड्या नेत्यांना पक्षांनी मोठी जबाबदारी सोपवली असून त्यांची चांगलीच कसरत बघायला मिळणार आहे.
हेही वाचा…“बॉम्बस्फोटच्या वेळी दाऊद भाजपचा अध्यक्ष..,” उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना दिलं जोरदार प्रत्युत्तर
तेलंगणा राज्याच्या ११४ विधानसभा मतदारसंघासाठी येत्या ३० नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. मतदान झाल्यानंतर लगेचच ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार असल्याने आतापासून निवडणुकांचा प्रचार सुरू झाला आहे. या निवडणुकीसाठी काॅंग्रेसने राज्यातील माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे विशेष निरिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. याच राज्यात माणिकराव ठाकरे यांना काॅंग्रेसने प्रभारी म्हणून निवड केली आहे. तर भाजपकडून राज्यातीलच खासदार प्रकाश जावडेकर यांच्याकडेही जबाबदारी दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील या नेत्यांचा तेलंगणा राज्यात मोठा कस लागणार आहे.
हेही वाचा…राज्यात नवी राजकीय समीकरणं जुळणार? प्रकाश आंबेडकरांनी घेतली शरद पवारांची भेट
दरम्यान, तेलंगणाचे मुख्यमंत्री के.सी. आर यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या ११५ उमेदवारांची पाहिली यादी जाहीर केली आहे. तर के.सी.आर दोन मतदारसंघातून निवडणूक लढविणार आहे. यानिवडणुकीत के.सी.आर यांना काॅंग्रेसचा मोठा सामाना करावा लागणार आहे. तर भाजपने देखील मोठी तयारी केली आहे. त्यामुळे के.सी.आर या निवडणुकीत सत्ता राखणार की काॅंग्रेस ताब्यात घेणार ? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“प्रकाश आंबेडकरांनी निवडणुकांसाठी आघाडीसोबत आले पाहिजे,” काॅंग्रेसच्या बड्या नेत्यांनी दिले युतीचे संकेत
हेही वाचा…वाद वाढला…! “कोकणातील एकही मराठा कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही”,नारायण राणेंनंतर शिंदे गटाच्या नेत्याचा दावा
हेही वाचा…“..म्हणूनच राष्ट्रवादीच्या सर्व पदाचा राजीनामा दिला”,भुजबळांचा गड गडगडला, खंदे समर्थकाने दिला राजीनामा
हेही वाचा…“प्रकाश आंबेडकर जर आघाडीसोबत येत असतील तर…,”काॅंग्रेसच्या बड्या नेत्यांचं मोठं विधान
हेही वाचा…मोठी बातमी…! मराठा समाजाचे नेते विनायक मेटेंच्या पुतण्याची आ’त्म’ह’त्या’, राज्यात एकच खळबळ