सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांनी सातारा एसटी स्टँड नजीक काही वर्षांपूर्वी उभारलेल्या क्रीडा संकुलबाबत संतप्त अशी प्रतिक्रिया दिली आहे. साताऱ्यातील स्टेडियमचं वाट्टोळं करून मी नाही मी नाही काही केलं म्हणणाऱ्यांना मुस्काडलं पाहिजे, असा संताप उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केला आहे. तत्कालिन पालकमंत्री अजित पवार असल्यामुळे उदयनराजेंचा हा रोख उपमुख्यमंत्री पवार यांच्या दिशेने असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
शेतकऱ्यांच्या हिताच्या आड जो येईल त्याला तुडवणार; राजू शेट्टींचा इशारा
उदयनराजे यावेळी बोलताना म्हणाले, चुकीच्या पद्धतीने हे संकुल उभे केले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्याकाळी रणजी ट्रॉफी शाहू स्टेडियमवर भरवल्या जात होत्या. रणजीही झाल्या. तेव्हा ट्रॉफीची मॅचेस घेऊ शकलो असतो. सातारा प्राईम एरिया आहे. स्टँडच्या शेजारी आहे. एवढं असताना संकुल उभारलं गेलं नाही. बी. जी. शिर्केंनी बालेवाडीचं स्टेडियम कॉमन वेल्थसाठी बांधलं होतं. त्यांनी आपल्या संकुलासाठी निघालेल्या टेंडरसाठी फॉर्म भरला होता. हे का सांगतो, हे मीडियात आलं पाहिजे. हे आमदार, खासदार जी सो कॉल्ड माकडं आहेत ना, या सगळ्यांनी त्यातून बोध घ्यायला हवा. राजकारणापलीकडे जाऊन विचार करायला पाहिजे. स्पोर्ट्स आणि इतर ठिकाणी राजकारण आणू नये. इकडे वाट्टोळं करून टाकलं सर्वांचं, असा संताप उदयनराजेंनी व्यक्त केला.
मुख्यमंत्र्यांमध्ये थोडी चाड शिल्लक असेल तर नवाब मलिकांचा राजीनामा घ्यावा – राधाकृष्ण विखे पाटील
पुढे बोलताना ते म्हणाले, त्यावेळी पालकमंत्री होते इकडचे. त्यांनी या सर्वांवर उत्तर द्यावं. प्रत्येकवेळी मी नाही… मी नाही… मी काय केलं मी काय केलं… मुस्काडलं पाहिजे यांना…ऐन मोक्यावरची जागा कशी मिळणार? ज्यांनी बांधकाम केलं… आपण टेंडर काढलं होतं स्टेडियमचं. आपण काही व्यापारी संकुलाचं टेंडर काढलं नव्हतं, असंही ते म्हणाले. स्टेडियमचे टेंडर काढलेले असताना स्टेडियमच्या बाहेरून गाळे कसे बनवले? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
Read Also :
- तक्रारदार तक्रार करून गायब झाला, कुठे गेला माहित नाही, पण केस सुरू आहे; उद्धव ठाकरेंची टोलेबाजी
- सरकारच्या जीआर’ वर औरंगाबाद’च्या अगोदर संभाजीनगर; नामकरणाचा वाद पुन्हा पेटणार?
- राज ठाकरे यांची तब्येत बिघडली; मनसेचे मुंबई, पुण्यातील मेळावे अचानक रद्द
- मोठा धक्का: लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपच्या सर्वच्या सर्व उमेदवारांचे अर्ज बाद
- ये वक्त वक्त की बात है, वक्त सबका बदलता है; नांदेडमधील सभेत छगन भुजबळांचा शायराणा अंदाज