पुणे : महाविकास आघाडी सरकार असतांना विकासनिधीवरून विरोधी पक्षाबरोबर सत्ताधारी पक्षातील आमदारांनी नाराजी व्यक्त केली. यानंतर राज्यात शिंदे सरकार आल्यानंतरही आमदारांना निधी दिला जात नसल्याच्या तक्रारी समोर आल्या. यातच आज पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. या बैठकीत कोणत्याही आमदारांना निधी कमी पडू देणार नसल्याचं राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवारांनी सांगितलं.
हेही वाचा…“शरद पवारांनी ठाकरेंबद्दल पुस्तकात काय लिहिलंय, ? फडणवीसांनी सांगितल्या त्या ‘१०’ गोष्टी”
पुणे जिल्ह्यात विधानसभेच्या २१ जागा असून सत्ताधारी पक्षाचे ८ आणि विरोधी पक्षातील म्हणजे आघाडीचे एकूण १३ आमदार आहेत. निधीवाटप करत असतांना मागच्या वेळस आमदारांवर अन्याय झाला. यावेळी चंद्रकांत पाटलांना विनंती केली की, असं करून चालणार नाही. भाजप आणि शिंदे गटाला किती पैसे द्यायचे ते तुम्ही ठरवा. पंरतु एकदम विरोधी पक्षातील आमदारांना निधी कमी देऊन चालणार नाही. त्यातून मी मार्ग काढतो असं चंद्रकांत पाटलांनी मला सांगितले. असं अजित पवारांनी सांगितले.
हेही वाचा…खळबळजनक..! भाजप नेत्याचा तरूणीवर लैंगिक छळ, आ’त्म’ह’त्ये’चा प्रयत्न, चंद्रकांत पाटील, निंबाळकर, श्रीकांत देशमुखांवर आरोप
काही काही भागांमध्ये इतर सदस्यांची नावे टाकून इतरांनी मंजूर केली आहेत अशा काही आमदारांच्या माझ्याकडे तक्रारी होत्या. या जिल्ह्याचा अनेक वर्ष पालकमंत्री होतो परंतु. असा भेदभाव कधी केला नाही. तसेच खासदारांनी देखील याबाबत आपली भूमिका मांडली पाहिजे. असंही अजित पवारांनी म्हटलं.
READ ALSO :
हेही वाचा…सुषमा अंधारेंना मारहाण करण्याचा दावा करणाऱ्या आप्पासाहेब जाधवांची हकालपट्टी, पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका
हेही वाचा…शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा मुहर्त ठरला…! तारीख ठरली, मंत्रीपदासाठी नावांची यादी तयार ?
हेही वाचा…“सुषमा अंधारे तुमचं म्हणजे जिकडे राशन तिकडेच भाषण हे खरं आहे का ?” बीडच्या राड्यात शिंदे गटाची उडी
हेही वाचा…“आघाडीत कोणताही फार्म्युला ठरला नाही, शिउबाठा लोकसभेच्या १९ जागांवर कायम,” आघाडीत शिजतंय काय?
हेही वाचा…“सुषमा अंधारेंनी कार्यकर्त्यांकडून २ लाख रूपये घेतलं”,आप्पासाहेब जाधवांचा आरोप, पक्षविरोधी कारवाईचा ठपका