मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात महाविकास आघाडीने जोरदार तयारी सुरू केल्या आहेत. त्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासास्थानी झालेल्या बैठकीत जागा वाटपासाठी एक समिती देखील तयार केली जाणार आहे. यातच लोकसभेसाठी महाविकास आघाडीमध्ये प्रत्येकी १६ असा जागावाटप ठरल्याची माहिती समोर येत आहे. त्यावर खासदार संजय राऊतांनी प्रतिक्रिया देत असं काहीही ठरल्याचं सांगितलं आहे.
हेही वाचा…“पंकजा मुंडे- धनंजय मुंडेंच राजकीय वैर संपलं, ? सहकाऱ्यासाठी एकत्र पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया”
कर्नाटकच्या निकालानंतर शरद पवारांनी तातडीची बैठक घेत आगामी निवडणुका एकत्र लढण्याचे संकेत दिले. त्यानंतर जागावाटपासाठी आघाडीतील राष्ट्रवादी, काॅंग्रेस आणि शिवसेना उबाठा यातील प्रत्येकी २ असे सहा सदस्य समितीत असतील. असं सांगण्यात आलं. यातच महाविकास आघाडीतील तीन्ही पक्षांमध्ये प्रत्येकी १६ जागां देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली. त्यावर संजय राऊतांनी हा दावा फेटाळत शिवसेना १९ जागा लढविणार असल्याचं सांगितलं.
हेही वाचा…“उद्धव ठाकरेंना कुणी हे सांगायला तयार नाही की त्यांचा पोपट मेलाय”, फडणवीसांनी ठाकरेंना डिवचलं
मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत आम्ही जिंकलेल्या १९ जागा राहतील. तसेच त्या निवडणुकीत राष्ट्रवादीने ४ तर काॅंग्रेसने १ जागा जिंकली आहे. जिंकलेल्या जागा ह्या जिंकलेल्या जागा असतात. त्या कायम राहतील. जिंकून आलेले खासदार ते इकडे तिकडे गेले आहेत. ते निकाल लागल्यानंतर समजेल. त्यामुळे महाराष्ट्रात आमच्या १८ आणि दादरा नगरहवेलीत एक निवडून आले आहेत. अशा १९ जागा आमच्याकडेच असणार, असं म्हणत जागा वाटपाबाबत अजून आघाडीत कोणताही फार्म्युला ठरलेला नाही. असंही राऊतांनी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“सुषमा अंधारेंनी कार्यकर्त्यांकडून २ लाख रूपये घेतलं”,आप्पासाहेब जाधवांचा आरोप, पक्षविरोधी कारवाईचा ठपका
हेही वाचा…“शरद पवारांनी ठाकरेंबद्दल पुस्तकात काय लिहिलंय, ? फडणवीसांनी सांगितल्या त्या ‘१०’ गोष्टी”
हेही वाचा…खळबळजनक..! भाजप नेत्याचा तरूणीवर लैंगिक छळ, आ’त्म’ह’त्ये’चा प्रयत्न, चंद्रकांत पाटील, निंबाळकर, श्रीकांत देशमुखांवर आरोप
हेही वाचा…“सुषमा अंधारेंना खरंच मारहाण झाली का? नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर
हेही वाचा…“माझा पक्ष, माझ्याच राजीनाम्यावर, माझा पक्षच ठराव, मग मीच राजीनामा…”,फडणवीसांनी शरद पवारांना डिवचलं