बीड : राज्यात पहिल्यांदाच भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे निवडणुकीत एकत्र आलेत. वैद्यनाथ साखर कारखान्याच्या निवडणुकीत मुंडे बंधू-भगिंनी एकत्र आल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे. पंकजा मुंडे यांनी आज टीव्ही९ ला प्रतिक्रिया देतांना याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. त्यानंतर पंकजा मुंडे यांच्या प्रतिक्रियेनंतर मुंडे भाऊ-बहिणीचं राजकीय वैर संपलं का ? असा सवालही उपस्थित केला जात आहे.
हेही वाचा…“..तर त्यावेळी उद्धव ठाकरे राष्ट्रवादी अन् काॅंग्रेसचे सेनापती झाले असते”
वैद्यनात साखर कारखान्याच्या निवडणुकीत पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचं पॅनेल एकत्रित निवडणुक लढविणार आहेत. यात पंकजा मुंडे यांच्यापाठोपाठ खासदार प्रितम मुंडे, अॅड. यशश्री मुंडे, त्यांच्या मातोश्री प्रज्ञाताई मुंडे यांनी वैद्यनाथ साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलं नाही. यावर प्रतिक्रिया देतांना पंकजा मुंडे म्हणाल्या की, वैद्यानाथ साखर कारखान्याच्या निवडणुकीत आम्ही एकत्र पॅनल केलेलं आहे. आम्ही कारखान्याच्या हितासाठी एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. आमचे पक्ष जरी वेगळे असले ती सहकारी कारखान्यात आम्ही एकत्र आहोत.
हेही वाचा…“…त्यामुळे नार्वेकर हेच शिंदे गटाचे १६ आमदार अपात्र ठरवू शकतात,” सुप्रीम कोर्टाच्या वकिलांचं मोठं विधान ?
वैद्यनाथ साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी एकूण २१ जागांसाठी निवडणुक होत आहे. या निवडणुकीत एकूण ११ जागा ह्या पंकजा मुंडे गटाकडे तर १० जागा राष्ट्रवादीकडे म्हणजे धनंजय मुंडे यांच्याकडे असणार आहे. या निवडणुकीत यापुर्वी ज्या नेत्यांनी भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. अशा सगळ्या उमेदवारांना दोन्ही बहीण-भाऊ बाजूला ठेवल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
हेही वाचा…३ महिन्यात ५५१० मुली बेपत्ता, पुरोगामी महाराष्ट्रात चाललंय काय? दानवेंचं फडणवीसांना पत्र
दरम्यान, वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठई ५० जणांनी अर्ज दाखल केले आहेत. या निवडणुकीच्या अर्जांची आज छाननी होणार आहे. तर अर्ज मागे घेण्याची मुदत ही १ जुनपर्यंत असून ११ जुनला २१ जागांसाठी मतदान होणार आहे. त्याच्या दुसऱ्याच दिवशी १२ जूनला मतमोजणी केली जाणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“उद्धव ठाकरेंना कुणी हे सांगायला तयार नाही की त्यांचा पोपट मेलाय”, फडणवीसांनी ठाकरेंना डिवचलं
हेही वाचा…“राज्यात मोठा राजकीय ब्लास्ट होणार, २०२४ पर्यंत भाजपात मोठे नेते येतील,” भाजप नेत्याचा मोठा दावा
हेही वाचा…“मी उपमुख्यमंत्री पद आणि घर सोडायला तयार”, देवेंद्र फडणवीसांचं पुण्यात मोठं वक्तव्य
हेही वाचा…“कर्नाटक पॅटर्न नाही तर महाराष्ट्रात फक्त ‘मोदी पॅटर्न’ लागू होईल,” फडणवीसांचा आघाडीवर हल्लाबोल
हेही वाचा…“तुम्ही कपडे बदलतात तसे पक्ष बदलत आहात,” पुण्यात नितेश राणेंची पत्रकारानी इज्जतच काढली..! “राणेंची चुप्पी