पुणे : भाजपसाठी कार्यकर्त्यांनी मला पद आणि घर सोडायला लावलं तरी मी पक्षासाठी सोडायला तयार आहे. असं म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना संबोधतांना येत्या काळामध्ये सर्व कार्यकर्त्यांच्या त्यागाचं मुल्यमापन केलं जाणार असल्याचं सांगितलं. आज भाजपची राज्य कारिणी बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीत फडणवीस बोलत होते. त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टिका केली आहे.
हेही वाचा…“तुम्ही कपडे बदलतात तसे पक्ष बदलत आहात,” पुण्यात नितेश राणेंची पत्रकारानी इज्जतच काढली..! “राणेंची चुप्पी
टीआरपी कसा घ्यायचा ? याचं प्रशिक्षण आपल्याला घ्यावं लागेल. मीच माझा राजीनामा माझ्या पक्षाकडे देतो. माझा पक्ष माझ्या राजीनाम्यावर आक्रोश तयार करेल. मग माझा पक्षच ठराव करेल. मग मीच राजीनामा मागे घेईन आणि माझ्या जागी परत येईन. शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना आपल्या कृतीतून सांगितलं की राजीनामा देतो म्हणणं आणि राजीनामा देणं यातला फरक काय आहे. असंही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“..तर त्यावेळी उद्धव ठाकरे राष्ट्रवादी अन् काॅंग्रेसचे सेनापती झाले असते”
नाना पटोले यांना पुरस्कारच द्यायला हवा. नाना पटोले म्हणाले अंबानीच्या घरासमोर स्फोटकं मीच ठेवली. मलाही असं वाटायलं लागलं की, असं म्हणावं २२/११ चा बॉम्बस्फोट नाना पटोलेंनीच केला. माझा सवाल आहे की, वाझेला पोलीस दलात पुन्हा कुणी घेतलं? या वाझेला पोलीस दलात परत घेण्यासाठी उद्धव ठाकरेंची माणसं माझ्याकडे आली होती. मी फाईलवर लिहिलं मी हे करणार नाही. उद्धव ठाकरेंचं सरकार आल्यानंतर वाझेला पुन्हा नोकरीत घेतलं. तो वाझे मातोश्री किंवा वर्षावर असायचा. आता परमबीर सिंगनं तुमच्यावर आरोप केले तर आमची काय चुक आहे. त्याला मुंबईचं आयुक्त उद्धव ठाकरेंनीच केलं. आरोप केल्यानंतर उद्धव ठाकरेंनीच काढलं. वाझेच्या जबानीत सगळं पुढे आलंय. असंही ते म्हणाले.
दरम्यान, आत्ताच्या शिल्लक सेनेने न्यायालयात ८ याचिका दाखल केल्या होत्या. त्यातली एकही न्यायालयाने मान्य केली नाही. पण उद्धव ठाकरे म्हणतायत गावोगावी जा आणि आपलाच विजय झालाय, असं सांगा. बडवा. आपल्या बापाचं काय जातंय. पण तुमच्या मनात कोणतीही शंका ठेऊ नका पोपट मेलाय. पण उद्धव ठाकरे यांना कुणी हे सांगायला तयार नाही की पोपट मेलाय असा टोलाही त्यांनी लगावला.
READ ALSO :
हेही वाचा…“पंकजा मुंडे- धनंजय मुंडेंच राजकीय वैर संपलं, ? सहकाऱ्यासाठी एकत्र पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया”
हेही वाचा…“उद्धव ठाकरेंना कुणी हे सांगायला तयार नाही की त्यांचा पोपट मेलाय”, फडणवीसांनी ठाकरेंना डिवचलं
हेही वाचा…“राज्यात मोठा राजकीय ब्लास्ट होणार, २०२४ पर्यंत भाजपात मोठे नेते येतील,” भाजप नेत्याचा मोठा दावा
हेही वाचा…“मी उपमुख्यमंत्री पद आणि घर सोडायला तयार”, देवेंद्र फडणवीसांचं पुण्यात मोठं वक्तव्य
हेही वाचा…“कर्नाटक पॅटर्न नाही तर महाराष्ट्रात फक्त ‘मोदी पॅटर्न’ लागू होईल,” फडणवीसांचा आघाडीवर हल्लाबोल