मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षामुळे शिंदे सरकारच्या उर्वरित मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला होता. मात्र सर्वोच्च न्यायालयाने १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवल्याने शिंदेंना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या टप्प्याचा विस्तार लवकरच होणार असल्याचे संकेत आता राजकीय वर्तुळातून दिले जात आहेत.
हेही वाचा…“सुषमा अंधारेंना खरंच मारहाण झाली का? नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रीपदाची ३० जून रोजी शपथ घेतली होती. त्यानंतर तब्बल ३९ दिवसानंतर शिंदेंच्या पहिल्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. मात्र सत्तासंघर्षामुळे शिंदेंच्या दुसऱ्या मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला. सध्या शिंदेंच्या मंत्रिमंडळात २८ जागा भरल्या जाणार आहेत.
हेही वाचा…“माझा पक्ष, माझ्याच राजीनाम्यावर, माझा पक्षच ठराव, मग मीच राजीनामा…”,फडणवीसांनी शरद पवारांना डिवचलं
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील पुण्यातील कार्यक्रमात मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार असल्याचे सांगितले. त्यातच अपक्ष आमदार बच्चू कडूंन देखील मंत्रिमंडळाच्या विस्ताराचे संकेत दिलेत. तर भाजपच्या इतर नेत्यांकडून देखील असाच कयास बांधला जात आहे. त्यामुळे येत्या २३ किंवा २४ मे रोजी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती समोर येत आहे.
हेही वाचा…“पंकजा मुंडे- धनंजय मुंडेंच राजकीय वैर संपलं, ? सहकाऱ्यासाठी एकत्र पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया”
दरम्यान, पहिल्या मंत्रिमंडळाच्या विस्तार एकूण १८ आमदारांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली होती. या विस्तारात अपक्ष आणि महिला आमदारांना स्थान देण्यात आले नाही. त्यामुळे दुसऱ्या विस्तारात अपक्ष आणि महिला आमदारांचा समावेश केला जाणार आहे. यातच आमदार बच्चू कडू. प्रताप सरनाईक, सदा सरवणकर, चिमणराव पाटील, भरत गोगावले, संजय शिरसाट, यामिनी जाधव अशी नावं मंत्रिपदासाठी समोर येत आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…“सुषमा अंधारे तुमचं म्हणजे जिकडे राशन तिकडेच भाषण हे खरं आहे का ?” बीडच्या राड्यात शिंदे गटाची उडी
हेही वाचा…“आघाडीत कोणताही फार्म्युला ठरला नाही, शिउबाठा लोकसभेच्या १९ जागांवर कायम,” आघाडीत शिजतंय काय?
हेही वाचा…“सुषमा अंधारेंनी कार्यकर्त्यांकडून २ लाख रूपये घेतलं”,आप्पासाहेब जाधवांचा आरोप, पक्षविरोधी कारवाईचा ठपका
हेही वाचा…“शरद पवारांनी ठाकरेंबद्दल पुस्तकात काय लिहिलंय, ? फडणवीसांनी सांगितल्या त्या ‘१०’ गोष्टी”
हेही वाचा…खळबळजनक..! भाजप नेत्याचा तरूणीवर लैंगिक छळ, आ’त्म’ह’त्ये’चा प्रयत्न, चंद्रकांत पाटील, निंबाळकर, श्रीकांत देशमुखांवर आरोप