बीड : शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे ह्या कार्यकर्त्यांकडून पैसे मागत असून जिल्ह्याध्यक्ष पदही विकत असल्याचा आरोप करीत दोन चापटा मारल्याचा दावा ठाकरे गटाचे जिल्ह्याप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी केला. त्यानंतर सुषमा अंधारे यांनी हा दावा फेटाळून लावला. तर पक्षविरोधी कारवायाचा ठपका ठेवत आप्पासाहेब जाधव यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. या संपुर्ण राड्यात आता शिंदे गटाने उडी घेतली आहे.
हेही वाचा…“माझा पक्ष, माझ्याच राजीनाम्यावर, माझा पक्षच ठराव, मग मीच राजीनामा…”,फडणवीसांनी शरद पवारांना डिवचलं
शिंदे गटाच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी सुषमा अंधारे यांच्यावर टिका केली आहे. बीड जिल्ह्यात झालेला सुषमा अंधारे यांच्याबरोबरचा प्रकार धक्कादायक आहे. हे खरे आहेत का ? सुषमा अंधारे तुमचं म्हणजे जिकडे राशन तिकडेच भाषण हे खरं आहे का ? महाप्रबोधन यात्रेच्या वेळेला अवकाळी पाऊस पडला तरी सुषमा अंधारे म्हणतील ही शिंदे गटाची स्क्रिप्ट आहे. असं ज्योती वाघमारे यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“पंकजा मुंडे- धनंजय मुंडेंच राजकीय वैर संपलं, ? सहकाऱ्यासाठी एकत्र पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया”
शिवसेनेच्या महाप्रबोधन यात्रेसाठी खासदार संजय राऊत आणि उपनेत्या सुषमा अंधारे ह्या २० मे रोजी येत आहेत. गेल्या काही दिवसापासून सुषमा अंधारे यांची दादागिरी इतकी वाढली आहे. की त्या प्रत्येक कार्यकर्त्यांकडून दोन लाख रूपये मागत आहेत. त्यानंतर कार्यकर्त्यांनी जमावजमव करून पन्नास साठ हजार रूपये दिले. पण ताईंना हे पैसे फेकून दिलेत. त्यामुळे कार्यकर्ते ढसाढसा रडत आहेत. असंही अप्पासाहेब जाधव यांनी म्हटलं.
हेही वाचा…“उद्धव ठाकरेंना कुणी हे सांगायला तयार नाही की त्यांचा पोपट मेलाय”, फडणवीसांनी ठाकरेंना डिवचलं
दरम्यान, आमच्याच पक्षातील जिल्हाप्रमुख अर्थात अस्तीनीतील साप अप्पा जाधव याने काहीतरी लाईव्ह येऊन व्हिडीओ जाहीर केला आणि हा व्हिडीओ फक्त एक संभ्रम तयार करण्यासाठी आणि महाप्रबोधन यात्रेची दिनांक वीस तारखेला ग्रामीण महाराष्ट्रातील समारोपीय सभा गालबोल लावण्यासाठी हा सगळा बनाव केला असल्याचं सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“आघाडीत कोणताही फार्म्युला ठरला नाही, शिउबाठा लोकसभेच्या १९ जागांवर कायम,” आघाडीत शिजतंय काय?
हेही वाचा…“सुषमा अंधारेंनी कार्यकर्त्यांकडून २ लाख रूपये घेतलं”,आप्पासाहेब जाधवांचा आरोप, पक्षविरोधी कारवाईचा ठपका
हेही वाचा…“शरद पवारांनी ठाकरेंबद्दल पुस्तकात काय लिहिलंय, ? फडणवीसांनी सांगितल्या त्या ‘१०’ गोष्टी”
हेही वाचा…खळबळजनक..! भाजप नेत्याचा तरूणीवर लैंगिक छळ, आ’त्म’ह’त्ये’चा प्रयत्न, चंद्रकांत पाटील, निंबाळकर, श्रीकांत देशमुखांवर आरोप
हेही वाचा…“सुषमा अंधारेंना खरंच मारहाण झाली का? नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर