मुंबई : केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी मुंबईतील दौऱ्यावर असताना भाजपच्या नेत्यांना मुंबई महानगरपालिकेमध्ये 150 नगरसेवक निवडूण आणण्याचे आव्हान दिलं आहे. यावेळी भाजपने आपली रणनिती आखली आहे. याच दरम्यान आगामी निवडणुकांसाठी शिंदे गट आणि मनसे युती करणार असल्याचे संकेत मिळत आहेत. यावर शिंदे गटाचे प्रवक्ते किरण पावसकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
“ज्याच्याबरोबर जास्त आमदार आणि खासदार त्यांंचाच शिवाजी पार्कवर दसरा मेळावा”
बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना अभिप्रेत असणारी शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात पुढे जात आहे. शिवसेना-मनसे एकत्र यावेत हे भाकीत बाळासाहेब ठाकरेंनी केले होते. हे जर सत्यात उतरत असेल तर वाईट वाटण्याचं कारण नाही. परंतु यावर आत्ताचं सांगणं कठिण होईल. मन जुळत असतील. हिंदुत्वाच्या मुद्यावर एकक्ष येत असतील ते हे नैसर्गिक आहे असं त्यांनी म्हटलं आहे.
“बारामतीत कुणीही आलं तरी काही फरक पडत नाही”
मुंबई महापालिकेत कुणाशी कशी युती होईल याबाबत अजून कसलाही निर्णय झाला नाही. राज ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेतून त्यावेळी नेते बाहेर पडले होते. ते पक्षाच्या कार्यपद्धतीवर नाराज होते. माझा राग विठ्ठलावर नाही. आजूबाजूच्या बडव्यांवर आहे असं राज ठाकरे यांनी पहिल्याच भाषणात म्हटलं होतं. राज ठाकरे आणि त्यांचे सहकारी आजही हिंदुत्वापासून कुठेही दुर गेले नाहीत. मराठी माणसांच्या न्यायहक्कांसाठी पुष्कळ लढे आणि आंदोलन मनसेने केली आहेत असंही ते म्हणाले.
“अहमदशाह, आदिलशहा, कुतुबशहा आता अमित शाह, दिल्लीवरून असे किती…;” शिवसेनेने भाजपला डिवचलं
दरम्यान, गेल्या अनेक दिवसापासून शिंदे गट आणि मनसेसोबत जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यावर एकनाथ शिंदे यांनी अद्यापही आपली प्रतिक्रिया दिली नाही. परंतु एका मुलाखतीवेळी राज ठाकरेंना शिंदे गटाबाबत विचारले असता. त्यांनी असं म्हटलं होतंं, की शिंदे गट मनसेसोबत आल्यास आम्हाला काही हरकत नाही, त्यामुळे शिंदे गट मनसेसोबत युती करणार का? ते आता पहाणं महत्वाचं ठरणार आहे.
Read also
- “सुप्रिया सुळेंना पराभूत करण्याची भाषा हास्यास्पद “; रविकांत वर्पे
- 7 वेळा संसदरत्न, 3 वेळा लोकसभा खासदार, संसद विशिष्ट रत्न पुरस्कार; बारामतीत सुप्रिया सुळेंना हरवणे शक्य आहे का?
- “राग आल्यावर काहीही करतो, आता मी गुलाबराव पाटलांचा गळा दाबणार”; चंद्रकांत खैरे
- “वारंवार सांगूनही खात्यावर पैसे यायचे थांबत नसल्याने राजू शेट्टींनी गाठलं थेट तहसिल कार्यालय”
- “स्वत: ला पक्षात उमेदवारी मिळेना अन् बारामती जिंकणार म्हणे”; रूपाली पाटील