पुणे : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सध्या बारामती दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी 2024 ची लोकसभेची निवडणुक भाजप एकहाती जिंकेल आणि नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप 400 जागा जिंकेल असा दावा करत, बारामतीचा गड उद्धवस्त करण्याची भाषा केली. त्याचप्रमाणे लोकसभेत देशभरात 400+ आणि राज्यात 45+ जागा जिंकणार असल्याचं म्हटलं आहे. यावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते रवीकांत वर्पे यांनी बावनकुळे यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
“बारामतीत कुणीही आलं तरी काही फरक पडत नाही”
निर्मला सीतारमन या 2014 पासून राज्यसभेत आहेत. त्या संसदेत महारत्न खासदार सुप्रिया सुळे यांना पराभूत करण्याची भाषा करत आहेत, हे हास्यास्पद आहे. सुप्रिया सुळे या तीन वेळा सलग लोकसभेला निवडून आलेल्या आहेत. निर्मला सीतारमन बारामती फिरायला येणार असतील, तर आम्ही बारामती मतदारसंघात केलेला विकास त्यांना दाखवू. तुम्ही निश्चित या ठिकाणी या. तुम्हाला फार काळ राज्यसभेवर राहायचे नसेल तर या ठिकाणी सुप्रिया सुळे यांनी केलेला विकासाचा डोंगर पाहा. बारामती लोकसभा मॉडेल उभे केले आहे. त्याचं प्रेझंटेशन माझ्याकडे आहे ते पाहावे, असा टोला वर्पे यांनी सीतारमन यांना लगावाला आहे.
“अहमदशाह, आदिलशहा, कुतुबशहा आता अमित शाह, दिल्लीवरून असे किती…;” शिवसेनेने भाजपला डिवचलं
बावनकुळेंना साधे विधानसभेचे तिकीट मिळाले नाही. जनतेतून निवडून येता आले नाही. त्यांना विधानपरिषदेवर घ्यावे लागते. ते बारामती जिंकण्याची भाषा करतात. जे राज्यसभा आणि विधानपरिषदेवर निवडून येतात, त्यांनी बारामतीचा गड उद्ध्वस्त करण्याची भाषा करू नये, असा टोला रविकांत वर्पे यांनी बावनकुळेंना लगावला आहे.
“अमित शहा उद्धव ठाकरेंना खोटे म्हणत असतील तर ही चीड आणणारी बाब”
सुप्रिया सुळेंच्या कामाचे पुस्तक माझ्याकडे आहे. संसदेतील कामगिरी या विषयी सविस्तर आहवाल आणि माहिती माझ्याकडे आहे. विकासकामे असतील, रस्ते, जलसंधारण, रेल्वे अशा विविध कामांमध्ये सुप्रिया सुळे देशात आघाडीवर आहेत. त्यामुळे ज्यांना विधानसभेचे तिकीट मिळाले नाही, त्या बावनकुळे तर ज्या राज्यसभेवर काम करत आहेत त्या सीतारमन अशांना बारामतीचा गड उद्ध्वस्त करण्याची भाषा करू नये, असंही रविकांत वर्पे म्हणाले.
Read also
- 7 वेळा संसदरत्न, 3 वेळा लोकसभा खासदार, संसद विशिष्ट रत्न पुरस्कार; बारामतीत सुप्रिया सुळेंना हरवणे शक्य आहे का?
- “राग आल्यावर काहीही करतो, आता मी गुलाबराव पाटलांचा गळा दाबणार”; चंद्रकांत खैरे
- “वारंवार सांगूनही खात्यावर पैसे यायचे थांबत नसल्याने राजू शेट्टींनी गाठलं थेट तहसिल कार्यालय”
- “स्वत: ला पक्षात उमेदवारी मिळेना अन् बारामती जिंकणार म्हणे”; रूपाली पाटील
- “ज्याच्याबरोबर जास्त आमदार आणि खासदार त्यांंचाच शिवाजी पार्कवर दसरा मेळावा”