पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने मिशन बारामती सुरू केलं आहे. त्याच मिशन अंतर्गत आज केंद्रीय मंत्री निर्मला सितारमण आज पुणे दौऱ्यावर आहेत. याआधी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बारामतीचा दौरा केला होता. तसेच या दौऱ्यावेळी निर्मला सितारमण तीन दिवस पुण्यात राहणार असून ते तब्बल 21 कार्यक्रम करणार आहेत. त्यावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सीतारमण यांना इतर संस्था बघण्यास सांगितलं आहे.
“तोंडात सोन्याचा चमचा घेऊन आलेल्यांनीच मुख्यमंत्री व्हायचे काय?” शिंदेंचा सवाल
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण बारामतीत येत आहेत. सीतारमण बारामती आल्यानंतर बारामतीमध्ये अनेक संस्था आहेत. ज्या त्यांनी पाहाव्यात. त्यासाठी माझी ही त्यांना विनंती असेल की, कऋषी विज्ञान केंद्र आणि इतर संस्था पाहाव्यात यासाठी त्यांना आमंत्रण देण्यात आले आहे. जर सितारामण यांना वेळ असेल तर मी स्वत: फिरून त्यांना बारामती दाखवेन, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
“तरुणांच्या हाताला रोजगार कधी मिळणार ते सांगा”; अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना सुनावलं
बारामती दौऱ्यावर केंद्रीय मंत्री निर्मला सितारमण येत आहेत. त्यावर बोलताना ते म्हणाले की, देशात आता भाजपला अनुकुल वातावरण राहिलेलं नाही. नागरिकांमध्ये खुप अंसतोष आहे. याची कल्पना भाजपला आहे. त्यामुळेच देशात विविध लोकसभा मतदार संघांची जबाबदारी पक्षाच्या नेत्यांना निश्चित करून दिली जात आहे. बारामतीत सुप्रिया सुळे यांनी निर्मला सितारमण यांचं स्वागत केलं आहे. पण याआधीही पंतप्रधानांसह इतर बडे नेते बारामतीत येऊन गेले आहेत. याची आठवण करून देत भाजपच्या मिशन बारामतीचा काही परिणा होणार नसल्याचंही शरद पवार म्हणाले.
“रामदास कदमांनी महाराष्ट्रात फिरून दाखवावं”; सुषमा अंधारेंनी दिला कदमांना इशारा
दरम्यान, गेल्या अनेक दिवसापासून बारामती लोकसभा मतदारसंघाची चर्चा राज्यात सुरू आहे. बारामतीचा गढ आगामी निवडणुकीत आम्ही काबीज करू असं भाजपकडून सांगण्यात येत आहेत. तसेच त्यांना राष्ट्रवादीकडून देखील जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. यातच आता सितारामण बारामती दौऱ्यावर आल्या आहेत.
Read also
- “महाराष्ट्रातील जनता कोणाबरोबर आहे? हे दसऱ्याच्या दिवशी दिसेल”; शंभुराज देसाई
- “तर आम्ही उद्धव ठाकरे यांचं स्वागत करू”; खासदार राहुल शेवाळे यांचं वक्तव्य
- “आम्ही ५० जण बाजीगर होतो, त्यामुळे आम्हाला गद्दार म्हणायच्या भानगडीत पडू नका”; शहाजी पाटिल
- पत्राचाळमधील सर्व पैसे राऊतांनी ‘ठाकरे’ चित्रपटात वळवले; इडीचा दावा, राऊत अडचणीत
- “पत्रावाळ चाळ प्रकरणी शरद पवारांची चौकशी व्हावी”, भाजपची मागणी, शरद पवार म्हणाले, “लवकर करा, नाहीतर..:”