पुणे : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरोधात गरळ ओकणाऱ्या बंडखोर आमदार रामदास कदम यांच्याविरोधात सेनेकडून उद्यापासून आंदोलन करण्यात येणार आहे. रामदास कदम यांनी आता महाराष्ट्रात फिरून दाखवावं असा इशारा शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी दिला आहे. तसेच त्यांच्यावर जहरी टिका देखील केली आहे.
ज्या मराठवाड्यात रामदास कदम संपर्क प्रमुख म्हणून आला होता. त्याच लातूर, बीडमध्ये रामदास कदम यांनी एकदा येऊन दाखवावं. असं आवाहन अंधारे यांनी रामदास कदम यांना दिलं आहे. शिवसेनेचा एकही माणुस तुमच्या वैयक्तिक, तुमच्या कौटुंबिक आयुष्यावर कोणी घसरलं नाही. तरीही देखील तुम्ही एखाद्याच्या वैयक्तिक पातळीवर आले आहेत. सरड्या पेक्षा अधिक वेगाने रंग बदलत आहेत. असं देखील ते म्हणाले आहेत.
मराठा आरक्षण समितीचा 30 दिवसांचा अल्टिमेटम..! राज्य सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
तसेच ज्यांच्या मांडीला मांडी लावून बसला आहात. तेच तुम्हाला म्हणत आहे की, अहो रामदास कदम तुमचा पगार किती, तुम्ही बोलता किती? आज त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसत आहेत. असं म्हणत त्यांचा चिल्लर माणुस असा उल्लेख देखील केला आहे. त्यामुळे राज्यातील राजकारण आता या मुद्यांमुळे ढवळून निघण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
वेदांत प्रकल्प गुजरातला गेला..! शिंदे ॲक्शन मोडमध्ये, दिल्ली दौरा वादळी ठरणार ?
दरम्यान, दापोलीतील सभेत रामदास कदमांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. ते म्हणाले की, वारंवार मी बाळासाहेबांचा मुलगा. अरे हो कितीवेळा सांगशील. आम्ही कधी नाही म्हटलंय का? उद्धव ठाकरे बाळासाहेबांचा मुलगा नाही असं आम्ही म्हटलं का कधी? तुम्हाला काय संशय आहे काय? अरे आहेस ना तु त्यांचा मुलगा ते सांगायला कशाला लागतंय. तुझ्यामध्ये काही कर्तृत्व आहे का? असा खोचक टोला देखील त्यांनी हाणला.
Read also
- “राष्ट्रवादीची तळी उचलून तुमच्या पक्ष प्रमुखांनी संपूर्ण पक्ष भिकेला लावला”
- संजय राऊतांसोबत आता शरद पवारांची देखील पत्राचाळ प्रकरणी चौकशी करा; भाजप आमदाराची मागणी
- गुजरातला उद्योगाचा पेटारा , महाराष्ट्राला बेरोजगारीचा कटोरा ” “गुजरात तुपाशी , महाराष्ट्र उपाशी”
- “एसटी महामंडळाला निधी देताना हात आखडते का घेत आहेत?” रोहित पवारांचा सवाल
- “मायबाप जनतेला वाऱ्यावर सोडणं कितपत योग्य? खोके सरकारने याचं आत्मचिंतन करावं”; सुप्रिया सुळे