जळगाव : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड केल्यामुळे यंदाचा शिवसेनेचा दसरा मेळावा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट या दोन्ही बाजूंनी आम्हीच शिवाजी पार्क येथील मैदानावर दसरा मेळावा घेणार असल्याचा दावा करीत आहेत. दोन्ही बाजूंनी मैदानाच्या परवानगी साठी महापालिकेत अर्ज केले आहेत. परंतु अद्यापही कोणालाही परवानगी देण्यात आलेली नाही. याच पार्श्वभूमीवर कॅबिनेट मंत्री आणि शिंदे गटातील आमदार गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
“दसरा मेळाव्याची स्क्रिप्ट बारामतीवरून येणार, अबु आझमी व ओवेसी स्टेजवर असणार का?” मनसेचा खोचक सवाल
यंदाचा ठाकरे सेनेचा दसरा मेळावा सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्या मिक्स विचारांचा मेळावा असेल, तर आमचा हिंदुत्व आणि बाळासाहेबांच्या विचारांचा मेळावा असणार आहे. तसंच आमचं नातं हिंदुत्वाशी आहे. मात्र त्यांचं नातं कोणाशी आहे,? असा खोचक सवाल गुलाबराव पाटलांनी उद्धव ठाकरे यांना केला आहे. त्यावरून आता सेनेत आणि गुलाबरराव पाटलांमध्ये खडाजंगी होण्याची शक्यता आहे.
“आज रामदास कदमांचं खरं रूप समोर आलं, उद्या सगळ्याच बंडखोर आमदारांचं रूप समोर येईल”
शिवसेनााप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे बॅनर लावलेल्या मागील बाजूस जुगाराचा अड्डा जळगाव मध्ये दिसून आला. त्यावर बोलताना ते म्हणाले की, कोणत्याही पक्षाचं कार्यालय हे न्याय देवतेचे कार्यालय असतं. त्यामुळे अशा ठिकाणी सट्टा अड्डा चालविणे ही निषेधार्ह बाब आहे. शिंदे गटातील ज्या महिला पदाधिकाऱ्याने सट्टयाचा अड्डा उधळून लावला आहे. तिचं मी स्वागत करतो असं देखील ते म्हणाले.
Read also
- मराठा आरक्षण समितीचा 30 दिवसांचा अल्टिमेटम..! राज्य सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
- वेदांत प्रकल्प गुजरातला गेला..! शिंदे ॲक्शन मोडमध्ये, दिल्ली दौरा वादळी ठरणार ?
- तर मी महाराष्ट्राच्या विधानसभेत आत्महत्या करेन..! सेनेच्या आमदाराचं शिंदेंना इशारा
- “तिघाडी सरकारचा पुण्यात सुफडा साफ झाला..! तीन तिघाडा, काम बिघाडा”; रूपाली पाटील
- राऊतांचा खासदार म्हणून महिन्याला 1 लाख 85 हजार अन् सामनात 1 लाख पगार..! इडीने जाहीर केलं राऊतांचं आरोपपत्र