नाशिक : राज्यातील तरूणांना बेरोजगारीच्या खाईत लोटण्याऱ्या महाराष्ट्र विरोधी उद्योग चालवणाऱ्या शिंदे – फडणवीस सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस वतीने राज्यभर आंदोलन करण्यात येत आहेत. यावेळी नाशिक येथे माझ्या समवेत राष्ट्रवादी युवक काँग्रेस नाशिक येथील पदाधिकाऱ्यांनी भाजप चा निषेध नोंदवत आंदोलन केले.
तर मी महाराष्ट्राच्या विधानसभेत आत्महत्या करेन..! सेनेच्या आमदाराचं शिंदेंना इशारा
यावेळी ” गुजरात ला उद्योगाचा पेटारा , महाराष्ट्राला बेरोजगारीचा कटोरा ” “गुजरात तुपाशी , महाराष्ट्र उपाशी” अशा घोषणा देऊन निषेध व्यक्त करण्यात आला. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या या आंदोलनाला राज्यभरात उत्स्फूर्त प्रतिसाद देत असंख्य तरुण सहभागी होत आहेत. यावेळी आंदोलनाला माझ्या समवेत राष्ट्रवादी युवकचे प्रदेश कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडलग , नाशिक शहराचे अध्यक्ष रंजन भाऊ ठाकरे , नाशिक शहर युवक चे अध्यक्ष अंबादास खैरे , राष्ट्रवादी चे नेते निवृत्ती महाराज व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“तिघाडी सरकारचा पुण्यात सुफडा साफ झाला..! तीन तिघाडा, काम बिघाडा”; रूपाली पाटील
गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात फॉक्सकॉन वेदांता प्रकल्पावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार हल्लाबोल सुरू झाला आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांवरून राज्यात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. यातच वेदांतपेक्षा मोठा प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राला मोठा प्रकल्प देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. अशातच उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत.
Read also
- “एसटी महामंडळाला निधी देताना हात आखडते का घेत आहेत?” रोहित पवारांचा सवाल
- “मायबाप जनतेला वाऱ्यावर सोडणं कितपत योग्य? खोके सरकारने याचं आत्मचिंतन करावं”; सुप्रिया सुळे
- “आमचा दसरा मेळावा हिंदुत्वाच्या विचारांचा, त्यांचा शरद पवार अन् सोनिया गांधीच्या विचारांचा”; गुलाबराव पाटील
- मराठा आरक्षण समितीचा 30 दिवसांचा अल्टिमेटम..! राज्य सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
- वेदांत प्रकल्प गुजरातला गेला..! शिंदे ॲक्शन मोडमध्ये, दिल्ली दौरा वादळी ठरणार ?